IMPIMP

BAN vs PAK | पाकिस्तानने युगांडाचा विक्रम मोडला ! हसन अलीला ICC नं ठोठावला दंड

by bali123
ban vs pak pakistan tour of bangladesh 2021 bangladesh vs pakistan 2021 hasan ali reprimanded for breaching icc code of conduct

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – BAN vs PAK | पाकिस्तानच्या संघाने कर्णधार बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली सलग दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात विजय मिळवला आहे. कालच्या सामन्यात पाकिस्तानने बांग्लादेशवर (BAN vs PAK) 8 विकेट्स व 11 चेंडू राखून विजय मिळवला. पाकिस्तानने या विजयाबरोबरच (BAN vs PAK) मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. तसेच या विजयाबरोबरच त्यांनी युगांडाचा (Uganda) विक्रम मोडला आहे.

कालच्या सामन्यात बांग्लादेशची सुरुवात अडखळत झाली. शाहिन आफ्रिदीनं (Shahin Afridi) पहिल्या षटकात, तर मोहम्मद वासीमनं (Mohammed Wasim) दुसऱ्या षटकात बांगलादेशला धक्के देत दोन विकेट घेतल्या. त्यावेळी बांगलादेशची 2 बाद 5 अशी अवस्था झाली होती. यानंतर नजमुल होसैन (Najmul Hossain) व आफिफ होसैन (Afif Hossain) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 46 धावा करत बांगलादेशचा डाव सावरला. पण त्यानंतर ठराविक फरकाने विकेट पडत गेल्याने बांगलादेशला 20 षटकांत 7 बाद 108 धावाच करता आल्या. या सामन्यात बांग्लादेशच्या नजमुलनं सर्वाधिक 40 धावा केल्या.
या सामन्यात शाहिन आफ्रिदी व शादाब खान (Shadab Khan) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

यानंतर प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या पाकिस्तानने कर्णधार बाबर आझमची विकेट लगेच गमावली.
पण त्यानंतर मोहम्मद रिझवान आणि फाखर झमाननं (Fakhar Zaman) मोठी पार्टनरशिप करत संघाचा विजय पक्का केला.
या सामन्यात मोहम्मद रिझवाननं 39 व फाखर झमाननं नाबाद 57 धावा केल्या आहेत.
या विजयासह पाकिस्तानने या वर्षी सर्वाधिक 15 ट्वेंटी-20 सामने जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिका (South Africa) व युगांडा यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

आयसीसीनं (ICC) हसन अलीला (Hassan Ali) ठोठावला दंड (Fine)

पहिल्या ट्वेंटी-20 मध्ये हसन अलीनं ICC च्या नियमांचं उल्लंघन केले होते.
त्यावेळी त्याने बांगलादेशच्या फलंदाजाला बाद केल्यानंतर इशारा केला (BAN vs PAK) होता.
यामुळे हसन अलीला आयसीसीच्या 2.5 कलमांतर्गत आयसीसीनं त्याला 1 डिमेरिट गुण व मानधनातील 20 टक्के रक्कम दंड म्हणून भरण्यास सांगितली आहे.

Web Title – ban vs pak pakistan tour of bangladesh 2021 bangladesh vs pakistan 2021 hasan ali reprimanded for breaching icc code of conduct

Related Posts