IMPIMP

BCCI | रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह ! भारताच्या तिन्ही कोचसह चौघे आयसोलेशनमध्ये

by bali123
BCCI | team india head coach ravi shastri along with four members in support staff to remain in isolation covid positive ind vs eng

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. या कसोटी मालिकेसाठी भारताचा मोठा चमू आणि सपोर्ट स्टाफ इंग्लंड दौऱ्यावर (India tour of England) आहे. या मालिकेतील चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने इंग्लंड संघावर वर्चस्व राखले आहे. मात्र यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय संघाचे तीन कोच (Coach) आणि एक सपोर्ट स्टाफ (support staff) सध्या आयसोलेशनमध्ये (Isolation) असल्याची माहिती बीसीसीआयने (BCCI) ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri), बॉलिंग कोच भरत अरुण (Bowling coach Bharat Arun), फिल्डिंग कोच आर श्रीधर (fielding coach R Sridhar) आणि फिजियोथेरपिस्ट नितीन पटेल (Physiotherapist Nitin Patel) या चौघांना खबरदारीचा उपाय म्हणून आयसोलेशनमध्ये ठेवले आहे, अशी माहिती बीसीसीआयने (BCCI) दिली.

रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह

शनिवारी संध्याकाळी रवी शास्त्री यांना कोरोना (Ravi Shastri Corona positive) झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या तिघांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. रवी शास्त्री वगळता टीम इंडियाच्या इतर सर्व सदस्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. इतर सदस्यांची टेस्ट निगेटिव्ह आल्याने भारत आणि इंग्लंड यांच्यातला चौथ्या टेस्टच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. रवी शास्त्री यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते, तरी त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Web Title : BCCI | team india head coach ravi shastri along with four members in support staff to remain in isolation covid positive ind vs eng

हे देखील वाचा :

Related Posts