IMPIMP

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; हेमंत पाटील ग्रुप, न्युट्रिलिशियस् संघांचा सलग दुसरा विजय

by nagesh
Punit Balan Group Women's Premier League | 7th Puneet Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament; the second consecutive victory of Hemant Patil Group and the Neutralists team

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Punit Balan Group Women’s Premier League | अ‍ॅल्थिट्युड स्पोर्ट्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित सातव्या ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत न्युट्रिलिशियस् संघ व हेमंत पाटील ग्रुप या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. (Punit Balan Group Women’s Premier League)

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सायली लोणकर हिच्या नाबाद ५९ धावांच्या जोरावर न्युट्रिलिशियस् संघाने लिजंड्स स्पोर्ट्स क्लबचा ७० धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना न्युट्रीलिशियस् संघाने २० षटकात ४ गडी गमावून १६० धावांचे आव्हान उभे केले. सायली लोणकर हिने नाबाद ५९ धावांची खेळी केली. यासह गौतमी नाईक (४६ धावा) आणि ऋतुजा गिलबिले (२४ धावा) यांनीही धावांचे योगदान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना लिजंड्स स्पोर्ट्स क्लबचा डाव ९० धावांवर आटोपला. (Punit Balan Group Women’s Premier League)

Punit Balan Group Women's Premier League | 7th Puneet Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament; the second consecutive victory of Hemant Patil Group and the Neutralists team

कर्णधार पुनम खेमनार हिच्या अष्टपैलु खेळीमुळे हेमंत पाटील संघाने स्मार्ट लायन्स् संघाचा ४ गडी राखून पराभव केला. स्मार्ट लायन्स् संघाने प्रथम फलंदाजी करताना १०६ धावा धावफलकावर लावल्या. हेमंत पाटील ग्रुपने हे आव्हान १९.२ षटकात व ६ गडी गमावून पूर्ण केले. श्रेया सुभाष (४३ धावा), पुनम खेमनार (१८ धावा) आणि नेहा गौरव (१६ धावा) यांनी संघाचा विजय सोपा केला.

गटसाखळी फेरीः सामन्याचा संक्षिप्त निकालः

न्युट्रीलिशियस् संघः २० षटकात ४ गडी बाद १६० धावा (सायली लोणकर नाबाद ५९ (३१, ८ चौकार, २ षटकार),
गौतमी नाईक ४६ (३६, ६ चौकार), ऋतुजा गिलबिले २४, खुशी मुल्ला २-२६) वि.वि. लिजंड्स स्पोर्ट्स क्लबः २० षटकात ८ गडी बाद ९० धावा
(दिव्या नाईक ३२, चार्मी गवई १८, आरती बेहनेवाल ३-९, स्वांजली मुळे २-१६); सामनावीरः सायली लोणकर;

Punit Balan Group Women's Premier League | 7th Puneet Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament; the second consecutive victory of Hemant Patil Group and the Neutralists team

स्मार्ट लायन्स्ः २० षटकात ६ गडी १०६ धावा (इश्‍वरी अवसरे ४७, मानसी तिवारी १६, किरण नवगिरे १७,
पुनम खेमनार १-१४) पराभूत वि. हेमंत पाटील ग्रुपः १९.२ षटकात ६ गडी बाद १०८ धावा
(श्रेया सुभाष ४३, पुनम खेमनार १८, नेहा गौरव १६, चिन्मयी बोरफाळे २-३४); सामनावीरः पुनम खेमनार.

Web Title :- Punit Balan Group Women’s Premier League | 7th Puneet Balan Group Women’s Premier League T-20 Cricket Tournament; the second consecutive victory of Hemant Patil Group and the Neutralists team

हे देखील वाचा :

Sun Melon Benefits | खरबूज ‘हे’ अद्भुत फळ, शरीराला हायड्रेटेड ठेवण्याबरोबरच केस गळणेही थांबतात

Suicide Attempt Near Mantralaya | शेतकऱ्याचा कुटुंबासह मंत्रालयासमोर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न

Maharashtra Police News | सहाय्यक पोलिस निरीक्षकासह 5 पोलिस निलंबित

Related Posts