IMPIMP

Punit Balan Group Women’s Premier League | 7 वी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा ! हेमंत पाटील ग्रुप, वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लब संघांची विजयी सलामी

by nagesh
Punit Balan Group Women's Premier League | 7th Punit Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament! Winning opener of Hemant Patil Group, Warriors Sports Club teams

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Punit Balan Group Women’s Premier League | अ‍ॅल्थिट्युड स्पोर्ट्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित सातव्या ‘पुनित बालन गु्रप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत हेमंत पाटील ग्रुप आणि वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. (Punit Balan Group Women’s Premier League)

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पुनम खेमनार हिने फटकावलेल्या ७२ धावांच्या जोरावर हेमंत पाटील ग्रुप संघाने लिजंड्स स्पोर्ट्स क्लबचा ८ गडी राखून सहज पराभव केला. लिजंड्स स्पोर्ट्स क्लब पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात ११८ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये चार्मी गवई हिने ४१ धावांचे योगदान दिले. पुनम खेमनार हिच्या ७२ धावांच्या खेळीमुळे हेमंत पाटील ग्रुपने (Hemant Patil Group) १३.४ षटकात विजयी धावसंख्या गाठली. पुनम खेमनार हिच्यासोबत प्रियांका सगवान हिने २९ धावांची खेळी केली.

Punit Balan Group Women's Premier League | 7th Punit Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament! Winning opener of Hemant Patil Group, Warriors Sports Club teams

File Photo

आदिती वाघमारे हिच्या अष्टपैलू खेळीमुळे वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लब संघाने स्मार्ट लायन्स् संघाचा ६ गडी राखून पराभव केला. स्मार्ट लायन्स्ने प्रथम फलंदाजी करताना १७.४ षटकात १०१ धावा धावफलकावर लावल्या. संघाचा कोणताच खेळाडू मोठी धावसंख्या उभी करू शकला नाही. वॉरीयर्सच्या आदिती वाघमारे हिने १७ धावात २ गडी बाद केले. याशिवाय साक्क्षी पाटील व उत्कर्षा कदम यांनीही अचूक गोलंदाजी केली. भक्ती मिरजकर (नाबाद ३४ धावा), दामिनी बनकर (नाबाद १८ धावा), माधुरी आगव (२३ धावा) आणि आदिती वाघमारे (१६ धावा) यांच्या फलंदाजीमुळे वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लबने १७.४ षटकात विजय मिळवला.

गटसाखळी फेरीः सामन्याचा संक्षिप्त निकालः

Punit Balan Group Women's Premier League | 7th Punit Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament! Winning opener of Hemant Patil Group, Warriors Sports Club teams

File Photo

लिजंड्स स्पोर्ट्स क्लबः २० षटकात ५ गडी बाद ११८ धावा (चार्मी गवई ४१ (४२, ४ चौकार), खुशी मुल्ला १३, निकीता सिंग १-१५, पुनम खेमनार १-२२) पराभूत वि. हेमंत पाटील ग्रुपः १३.४ षटकात २ गडी बाद ११९ धावा (पुनम खेमनार ७२ (४७, १० चौकार, २ षटकार), प्रियांका सगवान २९); सामनावीरः पुनम खेमनार;

स्मार्ट लायन्स्ः १७.४ षटकात १० गडी बाद १०१ धावा (किरण नवगिरे १८, रोहीणी माने नाबाद १७, कश्मिरा शिंदे १४,
आदिती वाघमारे २-१७, साक्क्षी पाटील २-१६, उत्कर्षा कदम २-१५) पराभूत वि. वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लबः १७.४ षटकात ४ गडी बाद १०४ धावा (भक्ती मिरजकर नाबाद ३४, दामिनी बनकर नाबाद १८,
माधुरी आगव २३, आदिती वाघमारे १६); सामनावीरः आदिती वाघमारे.

Web Title :- Punit Balan Group Women’s Premier League | 7th Punit Balan Group Women’s Premier League T-20 Cricket Tournament! Winning opener of Hemant Patil Group, Warriors Sports Club teams

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Mandira Bedi Bikini Photo | समुद्र किनारी मंदिरा बेदी विसरली स्वत:च वय, बिकिनीतील हॉट फोटोनं इंटरनेटचा वाढवला पारा…

Ravi Rana on CM Uddhav Thackeray | रवी राणांचा CM उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – ‘मागासवर्गीय महिलेला तुरुंगात टाकून तुम्ही नामर्दासारखं काम केलं’

Shoulder And Neck Pain | मान आणि खांद्याच्या वेदनांच्या बाबतीत करू नका निष्काळजीपणा, असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा संकेत

Related Posts