Ashadhi Wari 2025 | विठ्ठल भक्तांचा प्रवास होणार सुखकर! आषाढी वारीसाठी 80 विशेष ट्रेन, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

पंढरपूर : Ashadhi Wari 2025 | आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे १ जुलै ते १० जुलै दरम्यान पंढरपूर आणि मिरजसाठी ८० आषाढी विशेष गाड्या चालवणार आहे. त्यामुळे विठ्ठल भक्तांचा प्रवास आरामदायी होईल.
आषाढी वारीनिमित्त नागपूर ते मिरज ४ विशेष सेवा, नवीन अमरावती ते पंढरपूर ४ सेवा, खामगाव ते पंढरपूर ४ सेवा, भुसावळ ते पंढरपूर अनारक्षित विशेष गाडीच्या २ सेवा, लातूर ते पंढरपूर अनारक्षित विशेष गाडीच्या १० सेवा असणार आहे. तसेच, मिरज ते कलबुर्गी अनारक्षित विशेष गाड्यांच्या २० सेवा, कोल्हापूर ते कुर्डुवाडी अनारक्षित विशेष गाड्यांच्या २० सेवा आणि पुणे ते मिरज अनारक्षित विशेष गाड्यांच्या १६ सेवा चालविण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे की, आषाढी विशेष ट्रेनचे आरक्षण १६ जूनपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच, आयआरसीटीसी वेबसाइटवर विशेष शुल्कासह सुरू होईल. त्यामुळे आषाढी दरम्यान गैरसोय टाळण्यासाठी विठ्ठल भक्तांना लवकरच तिकिटे बुक करावी लागतील.
आषाढी विशेष ट्रेनचे आरक्षण विशेष शुल्कासह १६ जूनपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच, आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. त्यामुळे आषाढी वारीच्या वेळी प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी विठ्ठल भक्तांना लवकरच आपले तिकीट बूक करावे लागेल.
Comments are closed.