IMPIMP

Congress Manifesto For MH Election 2024 | काँग्रेसकडून विधानसभा जाहीरनाम्याचा आराखडा तयार; कर्नाटक आणि तेलंगणाच्या धर्तीवर विशेष फॉर्म्युले

मुंबई : Congress Manifesto For MH Election 2024 | लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाल्याने विधानसभेसाठी काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. दरम्यान विधानसभा निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याचा एक आराखडा तयार केला आहे. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सदस्य नितीन राऊत (Nitin Raut) यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

राज्य आणि जिल्हा पातळीवर जाहीरनामा तयार केला जाईल. विशेष म्हणजे, प्रत्येक उमेदवाराला त्याच्या विधानसभा क्षेत्रासाठी वेगळा जाहीरनामा तयार करण्याचीही मुभा दिली जाणार असल्याचे नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

मुस्लिम लोकही या देशाचे नागरिक असून तेही याच देशात जन्मले आहे. त्यांच्याही तेवढाच अधिकार आहे, जितका दुसऱ्यांचा आहे. त्यामुळे या जाहीरनाम्य़ात मुस्लिम समाजासाठीही विशेष तरतुदी करण्यात येतील,असेही नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसने कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काही विशेष फॉर्म्युले तयार केले होते. यात काँग्रेसने मतदारांना वेगवेळ्या गॅरंटी दिल्या होत्या. तशाच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही दिल्या जाणार आहेत. पण त्या कोणत्या असतील, हे अद्याप निश्चित झालेले नाही, असेही नितीन राऊत यांनी सांगितले. (Maharashtra Congress)