Crop Competition Pune | राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळित धान्य पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन
पुणे : Crop Competition Pune | राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. प्रयोगशील शेतक-यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यास शेतक-यांचे योगदान मिळेल, या उद्देशाने राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. रब्बी हंगाम सन २०२४ पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत संधी असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकस्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे (Commissionerate of Agriculture) विस्तार व प्रशिक्षण कृषी संचालक रफिक नाईकवाडी (Rafiq Naikwadi) यांनी केले आहे.
कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या ५ पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र असून सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रु.१५० राहील. स्पर्धेत भाग घेण्याृसाठी शेतकऱ्याकडे स्व तःच्याध नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यधक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. तसेच पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी स्पर्धकास शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा आदी कागदपत्र आवश्यक आहेत. अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्या पुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात येईल. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते निवडण्यात येतील. स्पर्धेसाठी पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रुपये ३०० व आदिवासीगटासाठी रक्कम १५० रुपये प्रवेश शुल्क राहील.
स्पर्धेतील विजेत्यांना तालुका पातळीवर अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये, जिल्हा पातळीवर १० हजार, ७ हजार व ५ हजार रुपये तर राज्य पातळीवर ५० हजार, ४० हजार व ३० हजार रुपये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात येईल. पिकस्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही नाईकवाडी यांनी केले आहे.