IMPIMP

Gondia Shivshahi Bus Accident | गोंदियात शिवशाही बस उलटली; आठ ठार

Gondia Shivshahi Bus Accident

एन.पी. न्यूज ऑनलाईन – Gondia Shivshahi Bus Accident | नागपूरकडून गोंदियाच्या दिशेने निघालेली शिवशाही बस उलटल्याने आठ प्रवाश्यांचा मृत्यू तर दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी एक वाजता अर्जुनी तालुक्यातील डव्वा गावाजवळ घडली.

https://x.com/Dev_Fadnavis/status/1862415575680455158?t=3cyJQKUQYvQg7OdGu7EL7A&s=08

मिळालेल्या माहितीनूसार, शुक्रवारी गोंदिया भंडारा शिवशाही बस प्रवाशांना घेऊन गोंदियाच्या दिशेने निघाली होती. यावेळी डव्वा गावाजवळ बस उलटली. अपघात इतका भयंकर होता की, आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर, दहा ते पंधरा जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तात्काळ मदत कार्य सुरू केले. बचाव पथकाने बसमधून आठ मृतदेह बाहेर काढले. तसेच जखमींना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जखमींमध्ये काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जातयं. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी अपघातातील मृतांच्या वारसांना तातडीने 10 लाख रूपये देण्याचे आदेश एसटी प्रशासनाला दिले आहेत.