IMPIMP

Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभेच्या तोंडावर भाजपला डबल धक्का तर काँग्रेसचे अच्छे दिन

Nana-Patole-Devendra-Fadnavis (1)

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता काँग्रेसला (Congress) अच्छे दिन येताना दिसत आहेत. भाजपला (BJP) धक्का देत माजी खासदार आणि आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित केले आहे. गोंदियाचे माजी आमदार गोपाल अग्रवाल (Former MLA Gopal Agrawal) आणि नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर (Bhaskarrao Patil Khatgaonkar) हे लवकरच समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खतगावकर हे अशोक चव्हाणांचे नातेवाईक असल्याने त्यांच्यासाठीही हा धक्का मानला जात आहे.

आज काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत माजी आमदार गोपाल अग्रवाल यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. गोपाल अग्रवाल हे दोन वेळा विधान परिषद (Vidhan Parishad) आणि तीन वेळा विधानसभेचे आमदार राहिले आहेत.

गोपाल अग्रवाल यांनी भाजपाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार अशोक चव्हाण यांचे दाजी माजी खासदार भास्करराव खतगावकर हेदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) खूप मोठी संधी भाजपात मिळेल. मोदी सरकार (Modi Govt) आल्यावर ते मंत्री होतील. त्यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याचा विकास होईल या हेतूने मी त्यांना पाठिंबा दिला. जी परिस्थिती भाजपात आज अशोक चव्हाणांची आहे त्यातून आमच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. मतदारसंघाच्या विकासासाठी मला मीनलच्या माध्यमातून लोकांचा विकास करायचा आहे.

नायगावची विधानसभा (Naigaon Assembly Constituency) मीनल खतगावकर (Dr. Meenal Patil Khatgaonkar) यांनी लढवावी आणि रवींद्र चव्हाणांनी (Ravindra Chavan) लोकसभा लढवावी असा निर्णय आमच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय, असं माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी सांगितले.