IMPIMP

Maharashtra CM Oath Ceremony | ‘महायुती’ सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख आली समोर, देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित

Lok Sabha and Assembly Election 2023

सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra CM Oath Ceremony | मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव जवळपास निश्वित झाले असून महायुती सरकारच्या (Mahayuti Govt) शपथविधी सोहळ्याचा मुहूर्त देखील ठरला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 5 डिसेंबरला आझाद मैदानावर (Azad Maidan Mumbai) हा सोहळा होणार असून त्याची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे.

महायुतीच्या नेत्यांच्या गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपद आणि सत्तावाटपासाठी बैठका सुरू आहेत. राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सार्या देशाचं लक्ष लागलं आहे. त्यातच महायुतीच्या नेत्यांनी एकमुखाने निर्णय घेतला आला आहे. मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस यांचे नाव जवळपास निश्वित झाले असून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.