IMPIMP

Nashik News | राजकारणातील वैरी एकत्र आले अन् गळ्यात गळे घालून भेटले, राऊत-फडणवीस-दरेकरांच्या भेटीने चर्चांना उधाण

by nagesh
Nashik News | shivsena leader and mp sanjay raut-bje leader devendra fadnavis pravin darekar meet each other in nashik marriage function marathi news 

नाशिक :  सरकारसत्ता ऑनलाइन – एरव्ही महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेले दिग्गज नेते आज मात्र वेगळ्याच मूडमध्ये (Nashik News) पहायला मिळाले. दररोज एकमेकांवर टीका करणारे संजय राऊत (Sanjay Raut), दवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रवीण दरेकर (Pravin Darekar), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आज नाशिकमध्ये (Nashik News) एका कार्यक्रमात मनमोकळ्या गप्पा मारताना दिसून आले. निमित्त होतं एका लग्नसोहळ्याचं.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , TelegramFacebook page for every update

भाजपच्या आमदार (BJP MLA) देवयानी फरांदे (Devyani Farande) यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त राज्यातल्या दिग्गज राजकीय नेत्यांची नाशिकमध्ये (Nashik News) मांदियाळी पाहायला मिळाली. या लग्न सोहळ्याला सर्व राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी संजय राऊत आणि प्रविण दरेकर हे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून गप्पा मारत होते. तर त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील गप्पा मारताना दिसून आले.

एकमेकांवर सातत्याने टीका करणारे राजकीय नेते (Political leaders) एकत्र येत गप्पा मारताना पाहून सर्वांच्याच भूवया उंचावल्या.
तसेच राजकीय वर्तुळात चर्चाही रंगण्यास सुरुवात झाली.
याच कार्यक्रमात एका सोफ्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,
छगन भुजबळ आणि संजय राऊत एकत्र बसल्याचे पहायला मिळाले.
यावेळी तिघांमध्ये जोरदार हास्य पहायला मिळाले. चंद्रकांत पाटील यांनी भुजबळांना टाळीही दिली.
तर चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी भुजबळांना नमस्कार केला. एरव्ही विरोधक असले तरी त्यांची या कार्यक्रमात मैत्री पहायला मिळाली.

याच कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात हस्तांदोलन झाल्याचे पहायला मिळालं. त्यानंतर संजय राऊत, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी एकमेकांसोबत मनमोकळ्या गप्पाही मारल्या.

कार्यक्रमानंतर काय म्हणाले चंद्रकांत पाटील
राजकीय नेते एकत्र आल्यावर याबाबत विविध चर्चा रंगत असतात.
या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले,
आपल्या संस्कृतीत काही प्रसंग असे आहेत मग ते निधन असो किंवा घरातील एखादे मंगलविधी असो…
अगदी एखाद्या कुटुंबात पाच भाऊ असतात ते खूप भांडतात आणि वाटण्या करतात,
मग दोन भावांच्या बायका एकमेकांकडे पाहत नाहीत पण लग्नाला येतात सर्वजण एकत्र.

यानंतर चंद्रकांत पाटील यांना विचारले की, अशाच दोन जुन्या भावांनी एकत्र यावं अशी काही शक्यता वाटते का आपल्याला?
त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, यावर मी काही टीपण्णी केली नाही…
मी एक ग्रामीण माणूस आहे सोपं उदाहरण दिलं की, पाच भाऊ भांडतात आणि लग्नात एकत्र येतात.

Web Title :- Nashik News | shivsena leader and mp sanjay raut-bje leader devendra fadnavis pravin darekar meet each other in nashik marriage function marathi news

Mumbai Session Court | होणाऱ्या पत्नीला अश्लील मेसेज पाठवणं गुन्हा नाही, मुंबई सत्र न्यायालयाची महत्त्वाची टिपण्णी

Sanjay Raut | संजय राऊत भाजपवर बरसले, म्हणाले – ‘आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, महाराष्ट्र 2 वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला’

ST Workers Strike | ST संपाचा आणखी एक बळी? संपकरी बसचालकाची आत्महत्या

Related Posts