Pune Accident News | पिकअप -दुचाकीच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू

पुरंदर: Pune Accident News | जेजुरी कोळविहिरे रस्त्यावर पिकअप व दुचाकीच्या झालेल्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. प्रशांत शिंदे (वय-२१) व मुजमिल शेख (वय-२२) अशी अपघातात अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हा अपघात (दि.१४) मध्यरात्री साडे बारा वाजताच्या सुमारास घडला.
जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.१४) मध्यरात्री साडे बारा वाजताच्या सुमारास जेजुरी कोळविहिरे रस्त्यावर पिकअप व दुचाकी गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात प्रश्नात शिंदे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर मुजमिल शेख या तरुणाचा उपचारादरम्यान मंगळवारी रुग्णालयात मृत्यू झाला. जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.