IMPIMP

Pune Rain Update | पुण्यासह कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, 24 तासासाठी असणार हायअलर्ट

rain

पुणे :  – Pune Rain Update | राज्यात पुन्हा एकदा वादळी पावसाचा जोर वाढला आहे. मान्सूनच्या आगमनाच्या आशेने कमाल तापमान ४० च्या वर गेले आहे. गुरुवारी (१२ जून) पश्चिम, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात वादळाच्या शक्यतेमुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

येत्या २४ तासांत कोल्हापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. हवामान खात्याने २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील.

येत्या २४ तासांत सांगली जिल्ह्यात ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. वादळ येण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात जिल्ह्यातील कमाल तापमान ३२ आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील.

साताऱ्यात पारा ३१.८ अंश सेल्सिअसवर राहिला. पुढील २४ तासांत सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसवर राहील. जिल्ह्यात ४०-५० किलोमीटर प्रतितास वेगाने विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि वारे पडण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमानात पुढील २४ तासांत किंचित घट होईल आणि पारा २८ अंशांवर राहील. भारतीय हवामान खात्यानेही यलो अलर्टसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३०.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील २४ तासांत कमाल तापमान ३० अंशांवर राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने आज हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.