Aditya Thackeray | आदित्य ठाकरे दिल्लीत, गांधी-केजरीवालांची घेणार भेट, निवडणुकांच्या धक्कादायक निकालांवर चर्चा, म्हणाले ”लोकशाहीत राहतोय हा समज दूर करून एकत्र यावे लागेल”

नवी दिल्ली : Aditya Thackeray | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची पुर्णपणे धुळधाण झाली. खुद्द सत्ताधार्यांनाही या निकालाचे आश्चर्य वाटले होते. अफाट असा विजय मिळूनही सर्वत्र अनाकलनीय अशी शांतता होती. आता या पाठोपाठ दिल्लीतही तेच घडले आहे. अशाप्रकारे निकाल लागत असल्याने एकुणच राजकारण चिंताजनक होत चालल्याचे म्हणत, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे दिल्लीत दाखल झाले आहेत. ते येथे काँग्रेसचे लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहेत.
मागील काही निवडणुकांमध्ये लागत असलेल्या धक्कादायक निकालांमुळे देशभरातील विरोधी पक्ष चिंतेच्या छायेत आहेत. ईव्हीएम, निवडणूक प्रक्रिया आणि एकुणच निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केल्या जात आहेत. दिल्लीत आपचा झालेला दारूण पराभव हे याचे अगदी ताजे उदाहरण आहे. याच संदर्भातच आदित्य ठाकरे यांचा हा दिल्ली दौरा आहे. या दिल्ली दौर्याचे कारण आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आदित्य ठाकरे म्हणाले, काल रात्री राहुल गांधींची भेट घेतली. आज अरविंद केजरीवालांची भेट घेणार आहे. वोटर फ्रॉड आणि ईव्हीएम फ्रॉडमुळे आपली मते कुठे जात आहेत हे कळत नाही. आपण लोकशाहीत राहत आहोत, हे भासवणे दूर करण्यासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, शिवसेना, आप किंवा काँग्रेससोबत जे झाले आहे, ते उद्या कदाचित बिहारमध्ये नितीशकुमार यांच्याबाबत होईल, आरजेडी, चंद्राबाबू यांच्याबरोबरही होईल. बिघडत चाललेल्या राजकारणावर बोलताना आदित्य यांनी भीती व्यक्त करत म्हटले की, भाजपा प्रत्येक स्थानिक पक्ष फोडून भाजपाची सत्ता स्थापन करेल.
आदित्य ठाकरे म्हणाले, पुढील रणनीती म्हणून इंडिया आघाडीसाठी वरिष्ठ नेते रोडमॅप तयार करतील. इंडिया आघाडीकडे संयुक्त नेतृत्व आहे. मोठ-मोठे नेते नेतृत्व करत आहेत. ही नेतृत्त्वाची लढाई नसून देशासाठी सुरू असलेली लढाई आहे.
Comments are closed.