IMPIMP

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

by nagesh
Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत Pune District Central Co-operative Bank (PDCC Bank) सध्या 800 जागा रिक्त आहेत. बँकेची आर्थिक क्षमता उत्तम असून, लवकरच गुणवत्तेनुसार या जागांची भरती केली जाईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. बारामती (Baramati) तालुक्यातील को-हाळे बुद्रुक येथील बँकेच्या शाखा स्थलांतर कार्यक्रमात ते बोलत होते. (Ajit Pawar On PDCC Bank Recruitment)

त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ”बँकेने मागील संचालक मंडळाच्या काळात 200 जागांची भरती केली होती. त्यातील 61 जणांनी नोकरी सोडली. परराज्यातील उमेदवारांना स्थानिक पातळीवर नोकरी मिळाल्यावर ते नोकरी सोडतात. त्यामुळे यापुढील भरती प्रक्रियेत जिल्ह्यातील उमेदवारांना संधी मिळावी, यासाठी कायद्याची अडचण दूर करण्याचा प्रयत्न सहकारमंत्र्यांशी बोलून केला जाईल. कांद्याचे दर घसरले आहेत. यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी नाफेडला पत्र देत खरेदी सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. मात्र, नाफेडला यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागते. ती मिळाल्यानंतर चांगल्या दराने कांदा खरेदी करता येईल. वेळ पडल्यास यासंबंधी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचाही सल्ला घेऊ,” असं ते म्हणाले.

पुढे अजित पवार म्हणाले, ”शेतक-यांना मदत व्हावी, यासाठी 5 लाखांपर्यंतचे कर्ज बँकेकडून शून्य टक्क्याने दिले जात होते. पण, जिल्ह्यात पीक कर्ज घेणा-या 2 लाख 41 हजार शेतक-यांपैकी फक्त 1200 जणांना त्याचा फायदा झाला. मूठभर लोकांसाठी 11 कोटी द्यावे लागले. त्यातून इतरांवर अन्याय होत असल्याने भावनेच्या भरात घेतलेल्या या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागणार असल्याचं,” ते म्हणाले,

त्याचबरोबर ”शेतक-यांची मुले परदेशी शिक्षणासाठी जातात. जिल्हा बँक त्यांना सध्या 25 लाख रुपये 7 टक्के व्याजाने देते.
ही मर्यादा वाढवून 40 लाखांवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
याव्यतिरिक्त, व्याजदर 2 टक्क्यांनी कमी करण्याचा प्रयत्न असल्याची,” माहिती देखील अजित पवार यांनी दिली आहे.

Web Title :- Ajit Pawar On PDCC Bank Recruitment |
recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

Rajyasabha Election | राज्यसभेसाठी संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार? शिवसेना फॉर्म्युल्यावर संभाजीराजेंमध्ये समझोता

Ajit Pawar On Raj Thackeray | राज ठाकरेंच्या सभेनंतर अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘राज ठाकरेंनी हवं ते म्हणावं, आम्हाला मात्र…’

Related Posts