IMPIMP

Coronavirus 3rd Wave | दिलासदायक ! देशात आता कोरोनाची तिसरी लाट येणार नाही; तज्ञ म्हणाले…

by nagesh
Coronavirus 3rd Wave | corona third wave not coming india delhi aiims randeep guleria said

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Coronavirus 3rd Wave | मागील दिड वर्षापासून कोरोनाच्या महाभंयकर विषाणूने धुमाकूळ घातला होता. कोरोनाच्या दुस-या लाटेनेही लोकांनी हतबल करुन टाकलं होतं. दरम्यान देशात कोरोनाच्या दुस-या लाटेत रुग्णांची संख्या अधिक होती. त्यांनतर काही प्रमाणात बाधितांच्या संख्येत घट झाली. सध्याही कोरोनाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. मागील 24 तासामध्ये 26,964 इतक्या नव्या बाधितांची संख्या दिसून आली. अशी परिस्थिती असताना देखील तज्ञांकडून तिस-या लाटेबाबत (Coronavirus 3rd Wave) एक दिलासदायक माहिती देण्यात आली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने मोठा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 26,964 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 383 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,45,768 नागरीकांचा मृत्यु झाला आहे. दरम्यान, कोरोनामुळे काही राज्यात मात्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता तिस-या लाटेबाबत तज्ज्ञांनी दिलासादायक माहिती दिली आहे.

देशात आता कोरोनाची तिसरी लाट येणार नसल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. दिल्लीच्या एम्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी कोरोना व्हायरस आता महामारी राहिला नसल्याचं म्हटलं आहे. पण जोपर्यंत देशातील प्रत्येक व्यक्तीचं लसीकरण होत नाही तोपर्यंत अत्यंत सावध आणि सतर्क असणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच सर्व लोकांना सण-समारंभाच्या काळात गर्दीपासून वाचण्याचा सल्ला दिला आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत थोडी घट होत आहे. कोरोना देशातून पूर्णत: कधीच नष्ट होणार नाही. पंरतु, भारतात वेगाने होणाऱ्या लसीकरणामुळे (Corona vaccination) कोरोनाचा वेग थोडा मंदावताना पाहायला मिळते.

पुढं गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी सांगितलं आहे की, कोरोना विषाणू हा लवकरच साधा ताप, सर्दी, खोकलासारखा होणार आहे.

कारण नागरीकांमध्ये कोरोना विरोधात प्रतिकार शक्ती तयार झाली आहे.
पण आजारी आणि प्रतिकार शक्ती कमी असलेल्या लोकांत कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका हा असणारच आहे. असे ते म्हणाले.
तसेच, देशातील सर्व लोकांना कोरोना लस देणं हे अत्यंत गरजेचं आहे.
काही लोकांना बूस्टर डोसची आवश्यकता भासू शकते. पण यावर निर्णय घेतला जाईल.
सर्वात आधी सर्वांनी लस घेतली पाहिजे त्यानंतर बूस्टर डोसचा विषय येईल.
डिसेंबरपर्यंत सर्वांना लस देण्याचं लक्ष्य असल्याचं डॉक्टर गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार देशामधील रिकव्हरी रेट हा 97.75 टक्क्यांवर पोहोचला आहे.
देशामधील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 2.08 आहे. जो गेल्या 88 दिवसांपासून 3 टक्क्यांच्या आत आहे. तर, गेल्या आठवड्यात जगभरात नोंदवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.
मागील २ महिन्यांच्या काळात पहिल्यांदा झालेली ही मोठी घट आहे.
जगातील सर्वच भागांत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
तसेच बळींच्या संख्येतही घट झाली असल्याचं ‘WHO’ ने सांगितलं.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे.
नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तसेच कोरोनावर अनेकांना यशस्वीरित्या (Coronavirus 3rd Wave) मात केली असून अनेक जण उपचारानंतर बरे झाले आहेत.
याच दरम्यान आता एक मोठा दिलासा मिळाला आहे. तर, भारतात 75 कोटींहून अधिक कोविड लसीचे डोस देण्यात आले आहेत.
जर याच वेगात लसीकरण सुरू राहिले तर डिसेंबरपर्यंत देशातील 43 टक्के लोकांचे लसीकरण (Corona vaccination) पूर्ण होईल, असं केंद्रीय आरोग्या मंत्रालयाने सांगितलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title : Coronavirus 3rd Wave | corona third wave not coming india delhi aiims randeep guleria said

हे देखील वाचा :

Pune Crime | घटस्फोट घेतल्यानंतर पतीचा पत्नीवर ‘बलात्कार’

Param Bir Singh | परमबीर सिंग यांच्याविरूध्द आणखी एका पोलिस निरीक्षकाची गंभीर तक्रार ! होणार खुली चौकशी?

Pune Crime | रिक्षाला धडक दिल्याचा जाब विचारल्याने गुंडाने रोखले पिस्तुल; कोंढवे धावडे येथील पेट्रोल पंपावरील घटना

Related Posts