IMPIMP

EPFO-Pension Payment Order | PPO नंबर हरवल्यास पेन्शन मिळण्यास येईल अडचणी; घरबसल्या करा ‘ही’ प्रोसेस, जाणून घ्या

by nagesh
EPFO-Pension Payment Order | if you lost pension payment order (ppo) number know how to get it back epfo news updates

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO-Pension Payment Order | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कर्मचाऱ्यांसाठी अनेक सुविधा आणत असते. त्याचबरोबर अनेक सुचना देखील वेळोवेळी देत असते. अशातच आता एक महत्वाची माहिती आहे. समजा तुमचा पीपीओ Pension Payment Order (PPO) नंबर हरवला असेल, तर तुमचे पेन्शन थांबू शकते. यामुळे तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते. कर्मचारी पेन्शन योजना (Employee Pension Scheme) पेन्शन धारकांना एक यूनिक नंबर दिला जातो. या नंबरला पेन्शन पेमेंट ऑर्डर नंबर म्हणजेच PPO म्हणतात. या माध्यमातून (EPFO-Pension Payment Order) पेन्शनर्सला रिटायरमेंट नंतर पेन्शन मिळते.

EPFO कडून कोणत्याही कंपनीतून रिटायर होणाऱ्या व्यक्तीला PPO नंबर दिला जातो. तसेच पेन्शन मिळू शकत नाही. म्हणून हा नंबर महत्त्वाचा ठरतो. कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून (EPFO) लाभार्थ्यांची ओळख होण्यासाठी पीपीओ नंबर, सॅलरी स्टेटस चेकर अशा सुविधा मिळतात. हा पीपीओ नंबर हरवला तर परत मिळवता येऊ शकतो. पेन्शनसंबंधी कोणत्याही कामाबाबत तक्रार करण्यासाठी EPFO मध्ये PPO नंबर देणं अनिवार्य असते. पेन्शन स्टेटस पाहण्यासाठीही हा नंबर माहित असणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, पीपीओ नंबर हरवल्यास परत कसा मिळवाल ? याबाबत महत्वाची माहिती जाणून घ्या. (EPFO-Pension Payment Order)

असा करा अर्ज –

सर्वात प्रथम EPFO च्या अधिकृत वेबसाइट https://www.epfindia.gov.in/site_en/index.php वर जा.

आता Online Services सेक्शनमध्ये Pensioners Portal च्या पर्यायावर क्लिक करा.

आता एक नवं पेज ओपन होईल. इथे Know Your PPO No वर क्लिक करा.

इथे तुमच्या ज्या बँक अकाउंटमध्ये दर महिन्याचे पेन्शन येते तो बँक अकाउंट नंबर टाका. किंवा तुम्ही तुमचा PF नंबर टाकूनही सर्च करू शकता.

सर्व डिटेल्स भरुन सबमिट करा.

त्यानंतर तुमचा PPO नंबर स्क्रीनवर दिसणार आहे.

Web Title :- EPFO-Pension Payment Order | if you lost pension payment order (ppo) number know how to get it back epfo news updates

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्याच्या हिराबाग चौकातील क्लिनिकमध्येच डॉक्टराचा ‘डर्टी पिक्चर’ ! स्वारगेट पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

Related Posts