IMPIMP

Indian Railway ने लाँच केली बायोमेट्रिक टोकन मशीन, जनरल कोचमध्ये होईल रिझर्व्हेशनसारखी व्यवस्था; जाणून घ्या

by nagesh
Indian Railway | indian railway launched biometric token machine reservation like arrangement in the general coach

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Indian Railway | भारतीय रेल्वेने (Indian Railway) प्रवाशांच्या सुविधेसाठी बायोमेट्रिक टोकन मशीन (biometric token machine) लाँच केली आहे. यामुळे सामान्य डब्ब्यात सुद्धा रिझर्व्हेशनसारखी सुविधा मिळेल. आता प्रत्येक प्रवाशाला आपली सीट माहित असेल आणि तो तिथेच जाऊन बसेल. यामुळे प्रवाशी सुद्धा गर्दीपासून वाचू शकतात आणि सामान्य डब्ब्यात होणारी धक्का-बुक्की बंद होईल. साऊथ सेंट्रल रेल्वेने सिकंदराबाबत रेल्वे स्टेशनवर ही मशीन लाँच केली आहे. ही अशी पहिली मशीन आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

कसे काम करेल मशीन

प्रवाशांना या मशीनमध्ये प्रवासासंबंधी माहिती द्यावी लागेल आणि यामध्ये आपला आंगठा सुद्धा लावावा लागेल. ही मशीन तुमचे बायोमेट्रिक मिळवेल. संपूर्ण माहिती घेतल्यानंतर मशीन तुम्हाला तिकिट देईल, ज्यामध्ये डब्बा नंबर आणि सीरियल नंबर असेल. याच आधारवर तुम्ही तुमच्या कोचमध्ये चढू शकता आणि आपल्या सीटवर बसू शकता. यामुळे सीटसाठी होणारी भांडणे आणि धक्काबुक्की बंद होईल.

काय होईल फायदा

– या मशीनमुळे प्रवाशांना गर्दीचा त्रास होणार नाही.

– ते आरामात ट्रेनमध्ये चढतील आणि आपल्या सीटवर बसतील.

– रेल्वेकडे (Indian Railway) प्रत्येक प्रवाशांच्या डिटेल असतील आणि कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगाराला ताबडतोब पकडले जाऊ शकते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

– पकडले जाण्याच्या भितीने गुन्हेगार सुद्धा ट्रेनमध्ये प्रवास करू शकणार नाहीत.

या कारणामुळे तुमचा प्रवास पहिल्यापेक्षा जास्त व्यवस्थित आणि सुरक्षित होईल. बायोमेट्रिक मशीन सर्वातप्रथम 14 सप्टेंबर 2021 ला लाँच करण्यात आली होती. सिकंदराबाद स्टेशनवर (sikandrabad railway station) लवकरच दुसरी बायोमेट्रिक मशीनसुद्धा लावली जाईल.

लाईनमध्ये उभे राहणार नाहीत प्रवाशी

रेल्वेने या मशीनबाबत माहिती देताना म्हटले की, बायोमेट्रिक मशीनचा मोठा फायदा स्टेशनवर गर्दी कमी करण्यास होईल. या कारणामुळे प्रवाशांना अगोदरपासून कोच नंबर मिळेल, यासाठी त्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागणार नाही.

Web Title : Indian Railway | indian railway launched biometric token machine reservation like arrangement in the general coach

हे देखील वाचा :

Pune Crime | बिल्डरला मागितली 1 कोटींची खंडणी; भ्रष्टाचारविरोधी ‘गांधीगिरी’ जनआंदोलनाच्या तोतया वकिलासह चौघांविरुद्ध FIR दाखल

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात 192 रूग्ण झाले ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corporation | बिबवेवाडी, धनकवडी येथील पुनर्वसन योजनेतील निवासी गाळे हस्तांतरणास सर्वसाधारण सभेची मंजुरी; परंतू…

Related Posts