IMPIMP

Needleless Vaccine | कोरोनाची बिगर इंजेक्शनची लस सुद्धा देणार सरकार, 1 कोटी डोस खरेदीचा आदेश

by nagesh
Needleless Vaccine | center orders procurement of one crore doses of zydus cadila needleless vaccine

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाNeedleless Vaccine | देशात कोरोना व्हायरस (corona virus) विरूद्ध लवकरात लवकर आणखी एक मोठे शस्त्र मिळणार आहे. केंद्र सरकारने अहमदाबादची कंपनी जायडस कॅडिला (Zydus Cadila) ची तीन डोसची व्हॅक्सीन (Three Dose Vaccine) ’जायकोव्ह-डी’ (Zycov-D) चे एक कोटी डोस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच या लशीचा राष्ट्रीय लसीकरण अभियानात या महिन्यात समावेश होईल. अधिकृत सूत्रांनी रविवारी ही (Needleless Vaccine) माहिती दिली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

सूत्रांनी सांगितले की, असे समजले जात आहे की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) देशात विकसित जगातील
पहिल्या डीएनए-आधारित कोविड-19 लशीला (world’s first developed DNA-based Covid-19 vaccine)
लसीकरण कार्यक्रमात सहभागी करण्यासाठी प्राथमिक पावलांना हिरवा झेंडा दाखवला आहे.

सुरुवातीला ही लस प्रौढांना देण्यात प्राधान्य दिले जाईल. जायकोव्ह-डी पहिली अशी लस आहे जिला भारताच्या औषध नियामकांनी 12 वर्ष किंवा त्यापेक्षा
जास्त वयाच्या लोकांना लसीकरणासाठी मंजूरी दिली आहे.
या लसीचा वापर विना इंजेक्शनने फार्माजेट तंत्राने (without injection by PharmaJet technique) केला जाईल.

किती आहे लसीची किंमत?

एका अधिकृत सूत्रांनी सांगितले की, केंद्राने जायडस कॅडिलाच्या जायकोव्ह-डी लशीच्या एक कोटी डोसची ऑर्डर दिली आहे.
ज्याची किंमत टॅक्स वगळता सुमारे 358 रुपये आहे.
या किमतीत 93 रुपये किंमतीच्या ’जेट एप्लीकेटर’च्या खर्चाचा (Needleless Vaccine) सुद्धा समावेश आहे.
याच्या मदतीनेच लसीचा डोस दिला जाईल.
सूत्रांनी सांगितले की, मर्यादित उत्पादन क्षमतेमुळे सुरुवातीला केवळ प्रौढांनाच ही लस दिली जाण्याची शक्यता आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दर महिन्याला 1 कोटी डोस

कंपनीच्या अधिकार्‍यांनी मंत्रालयाला सांगितले की, जायडस कॅडिला दरमहिन्याला जायकोव्ह-डीचे एक कोटी डोस पुरवण्याच्या स्थितीत आहे.
याचे तीन डोस 28 दिवसांच्या अंतराने दिले जाणार आहेत.
जगातील ही पहिली लस आहे जी डीएनए-आधारित आणि विना इंजेक्शनची (Needleless Vaccine) आहे.
या लसीला 20 ऑगस्टला औषध नियामकांकडून परवानगी मिळाली होती.

Web Title : Needleless Vaccine | center orders procurement of one crore doses of zydus cadila needleless vaccine

हे देखील वाचा :

Sameer Wankhede | नवाब मलिकांनी क्रांती रेडकरच्या बहिणीबाबत केलेल्या सवालावर समीर वानखेडेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

Free Ration | रेशन दुकानदार देत नसेल पूर्ण रेशन तर ‘या’ नंबरवर करा तक्रार; काही दिवसातच होईल पुर्ण ‘समाधान’

Nawab Malik | मंत्री नवाब मलिकांच्या नव्या दाव्यामुळं प्रचंड खळबळ; क्रांती रेडकरच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस?

Related Posts