IMPIMP

Restaurants Service Charges | रेस्टॉरंट्समध्ये जेवण करणे स्वस्त होणार?; सर्व्हिस चार्जला आळा घालण्यासाठी मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

by nagesh
Restaurant Service Charges | restaurant service charges not to pay in restaurant according to govt order

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Restaurants Service Charges | केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) आता रेस्टॉरंट्समधील (Restaurants) सेवा शुल्क म्हणजेच सर्व्हिस चार्ज बाबत (Service Charges) महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या निर्णयामुळे रेस्टॉरंट्समध्ये जेवण करणे थोडे स्वस्त होण्याची शक्यता आहे. ग्राहकांकडून अनेक रेस्टॉरंट्समध्ये वसूल केल्या जाणा-या सर्व्हिस चार्जला (Restaurants Service Charges) आळा घालण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या निर्णयाबाबत ग्राहक मंत्रालय (Ministry of Consumer Affairs) नॅशनल रेस्टॉरंट्स असोसिएशन ऑफ इंडिया सोबत (National Restaurants Association of India -NRAI) बैठक घेणार आहे.

ग्राहक मंत्रालयाची बैठक 2 जून रोजी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सर्व्हिस चार्ज देणे हे ग्राहकांवर अवलंबून आहे. त्यासाठी कोणतेही रेस्टॉरंट ग्राहकांवर जबरदस्ती करू शकत नाही. त्यामुळे याबाबत सरकारकडून ही बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचं,’ एका अधिकाऱ्यांनं सांगितलं आहे.

”सर्व्हिस चार्ज बाबत राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर (National Consumer Helpline) ग्राहकांनी याबाबत तक्रारी नोंदवल्या होत्या. त्याची दखल घेत ग्राहक मंत्रालयाने या बैठकीचे आयोजन केलेय. रेस्टॉरंट ग्राहकांकडून चुकीच्या पद्धतीने सर्व्हिस चार्ज घेत आहेत. हे शुल्क ऐच्छिक आहेत. ग्राहकांनी हा सर्व्हिस चार्ज द्यायचा की नाही, हे ठरवायचे आहे,” असं ग्राहक खात्याचे सचिव रोहित कुमार सिंह (Rohit Kumar Singh) यांनी NRAI च्या अध्यक्षांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. अशी माहिती एका वृत्तानुसार समोर आली आहे.

सचिवांनी लिहिलेल्या पत्रानुसार, हे शुल्क रेस्टॉरंटने मनमानी पद्धतीने निश्चित केले आहे.
जेव्हा ग्राहक बिलाच्या रकमेतून असे शुल्क काढून टाकण्याची विनंती करतात,
तेव्हा ग्राहकांची दिशाभूल करून असे शुल्क कायदेशीर ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय.
हा मुद्दा ग्राहकांच्या हक्कांचाही मुद्दा आहे. त्यामुळे ग्राहक विभागाने याची अधिक तपशीलवार तपासणी करण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे.

Web Title :- Restaurants Service Charges | Centre modi government warns restaurants over service charges, convenes meet over it

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Sambhajiraje Chhatrapati | शिवबंधन बांधणार की नाही ?; छत्रपती संभाजीराजे म्हणाले…

Gold Silver Price Today | जाणून घ्या किती रुपयांनी वाढले सोन्या-चांदीचे दर

Petrol-Diesel Price Today | कर कपातीनंतरचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूरमधील इंधनाचे दर

Related Posts