IMPIMP

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांचा पुन्हा वाढणार पगार, जाणून घ्या यावेळी किती होईल वाढ; ‘या’ पध्दतीनं करा कॅलक्युलेशन

by nagesh
PF Interest Rate | pf interest rate slashed by modi government do not worry these 5 investment options can get you good returns

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission | केंद्र सरकार सणासुदीच्या काळात लाखो केंद्रीय कर्मचार्‍यांना आणि पेन्शनर्सला महागाई भत्त्याच्या वाढीची (Dearness Allowance) आणखी एक भेट देऊ शकते. केंद्र सरकारने 1 जुलैपासून केंद्रीय कर्मचार्‍यांना आणि पेन्शनर्सला महागाई भत्त्यात (DA) 11 टक्के वाढ करून तो 17 ते 28 टक्के केला आहे. 1 जुलैपासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सला 28 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. जुलैच्या पगारासोबत (7th Pay Commission) तो मिळाला आहे.

आता वृत्त आहे की सरकार लवकरच जूनचा महागाई भत्ता (DA) सुद्धा जारी करू शकते. पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये सरकार केंद्रीय कर्मचार्‍यांचा आणि पेन्शनर्सचा डीए 3 टक्के वाढवू शकते. अशावेळी लोकांचा महागाई भत्ता 28 टक्केने वाढून 31 टक्केवर पोहचेल. म्हणजे पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात मोठी वाढ होईल.

CM सेक्रेटरी (स्टाफ साईड) शिव गोपाल मिश्रा यांचे म्हणणे आहे की, लवकरच सरकार याबाबत घोषणा करू शकते. AICPI चा जून 2021 मध्ये आकड़ा 121.7 वर पोहचला आहे. यामध्ये 1.1 अंकाची वाढ झाली आहे. अशाप्रकारे एकुण डीए 31.18 टक्के होतो. परंतु, डीएचे पेमेंट राऊंड फिगरमध्ये होते. यामुळे डिए 31 टक्के मिळेल. आता पुन्हा 3 टक्के वाढीनंतर महागाई भत्ता 31 टक्केच्या स्तरावर पोहचेल. म्हणजे केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात पुन्हा एकदा मोठी वाढ होईल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

31 टक्के महागाई भत्त्यावर कॅलक्युलेशन

कर्मचार्‍याचा मूळ पगार – 18,000 रुपये

नवीन महागाई भत्ता (31 टक्के)- 17,639 रुपये प्रति महिना

आतापर्यंत महागाई भत्ता (17 टक्के)- 9,673 रुपये प्रति महिना

किती महागाई भत्ता वाढला – 7966 रुपये प्रति महिना

वार्षिक पगारात वाढ – 7966×12 = 95,592 रुपये

28 टक्के महागाई भत्त्यावर गणना

कर्मचार्‍याचे मूळ वेतन – 18,000 रुपये

नवीन महागाई भत्ता (टक्के) – 5,040 रुपये प्रति महिना

आतापर्यंतचा महागाई भत्ता (17 टक्के)- 3,060 रुपये प्रति महिना

किती वाढला महागाई भत्ता – 1980 रुपये वाढला

वार्षिक वेतनात प्रति महिना – 1980×12 = 23760 रुपये

महागाई भत्त्याशिवाय (DA) हाऊस रेंट अलाऊन्स (HRA) सुद्धा वाढला

केंद्र सरकारने डिए (DA) वाढल्यानंतर केंद्रीय कमर्चर्‍यांना मिळणारे हाऊस रेंट अलाऊन्स (HRA) सुद्धा वाढवला आहे. सरकारने HRA ला वाढवून 27 टक्केपर्यंत केला आहे. महागाई भत्त्यानंतर आता हाऊस रेंट अलाऊन्स (HRA) वाढल्याने केंद्रीय कर्मचार्‍यांना लाभ झाला आहे.

एचआरएमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी 1-3 टक्केची वाढ करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार, आता केंद्रीय कर्मचार्‍यांना त्यांच्या शहराच्या हिशेबाने 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के हाऊस रेंट अलाऊन्स मिळेल. सध्या तीन क्लाससाठी 24 टक्के, 16 टक्के आणि 8 टक्के आहे.

Web Title : 7th pay commission latest news updates central government employees da hike 31 percent salary calculation hike

हे देखील वाचा :

PMRDA | ‘पीएमआरडीए’ने गावनिहाय सर्वेक्षण करून आरक्षणात बदल करावा

Milind Narvekar | किरीट सोमय्या यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मिलिंद नार्वेकर यांचा बंगला अखेर ‘जमीनदोस्त’

Pune Crime | गरजूंच्या जमिनी पैशाच्या अमिषाने लुटणारे पोलिसांच्या जाळ्यात, शिक्रापूर पोलिसांत 7 जणांवर गुन्हे; चौघांना अटक तर तिघे फरार

Related Posts