IMPIMP

Income Tax Return | ITR न भरल्याने तुम्हाला द्यावा लागतोय जास्त TDS? मग जाणून घ्या ही समस्या कशी सोडवावी?

by nagesh
Income Tax Return | if you are facing higher tds due to non filing of itr then check here how to get out of the list

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Income Tax Return | जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) फाईल केला आहे परंतु दुप्पट टीडीएस (TDS) द्यावा लागत असेल तर घाबरण्याची आवश्यकता नाही. प्राप्तीकर विभागाने (IT Department) 21 जून 2021 ला एक सर्क्युलर जारी केले आहे, ज्यामध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे की, जर कुणी व्यक्तीने आर्थिक वर्ष 2020-21 साठी आयटीआर फाईल (ITR Filing) केला, तर त्याचे नाव यादीतून हटवले जाईल आणि हाय TDS / TCS आता त्याच्यावर लागू होणार नाही.

नियम 1 जुलैपासूनच लागू

जर एखाद्या टॅक्सपेयर (Taxpayers) ने मागील 2 वर्षात TDS दाखल केला नसेल आणि प्रत्येक वर्षी TDS ची कपात 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल.
तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ITR दाखल करतेवेळी जास्त शुल्क वसूल करते.
हा नियम 1 जुलैपासूनच लागू केला आहे.

TDS आणि TCS चे दर

नवीन नियमांनुसार ज्या लोकांनी ITR फाईल केला नसेल त्यांच्यासाठी 1 जुलैपासून TDS आणि TCS चे दर 10 ते 20 टक्के असतील, तर अगोदर ते 5 ते 10 टक्के होते.

यादीतून नाव कसे हटवावे?

सर्क्युलरनुसार, जर कुणी व्यक्ती 2021-22 साठी उत्पन्नाचे वैध रिटर्न (फाईल आणि सत्यापित) दाखल करत असेल तर त्याचे नाव निर्देशित व्यक्तींच्या यादीतून हटवले जाईल.
हे दाखल करण्याच्या ठरलेल्या तारखेला केले जाईल. 2021-22 साठी उत्पन्नाचा परतावा किंवा वैध रिटर्न (फाईल आणि व्हेरिफिकेशन) च्या अ‍ॅक्चुअल फायलिंग डेटच्या नंतर ते हटवले जाईल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

ITR फायलिंगची लास्ट डेट 30 सप्टेंबर 2021

2020-21 वर्षासाठी ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.
एक्सपर्टनुसार एखाद्या व्यक्तीला दोन आर्थिक वर्षानंतर, प्राप्तीकर रिटर्न दाखल करणे आणि व्हेरिफिकेशन किंवा समाप्तीनंतरच निर्देशित यादीच्या बाहेर ठेवले जाईल.

30 सप्टेंबर 2021 च्या नंतर हटवले जाईल नाव

अशाप्रकारे एखाद्याने जेव्हा आपल्या आर्थिक वर्ष 2020-21 साठी आपला आयटीआर दाखल केला असेल, तर त्यास व्हेरिफाईड करा.
जर तुम्ही त्यावेळीपर्यंत तुमचा आयटीआर दाखल आणि सत्यापित केला आहे तर तुमचे नाव 30 सप्टेंबर 2021 च्या नंतर हटवले जाईल.

Web Title : Income Tax Return | if you are facing higher tds due to non filing of itr then check here how to get out of the list

हे देखील वाचा :

Rain in Maharashtra | आगामी 4 दिवस विदर्भासह राज्यातील काही भागात पाऊस कोसळणार; 11 जिल्ह्यांना Alert

Nitin Landge Bribe Case | ‘त्या’ 16 जणांची चौकशी होत नाही तोपर्यंत आरोपींना जामीन देवू नये ! जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला, जाणून घ्या

Pune Accident | भाजीपाला घेऊन जाणार्‍या रिक्षाचालकाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू

Related Posts