IMPIMP

SBI Alert | PAN Card बाबत असा मेसेज येतोय? तर वेळीच व्हा सतर्क, अन्यथा…

by nagesh
SBI Alert sbi customers getting pan card update message beware of this sms check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था SBI Alert | कोरोनाच्या काळात सायबर गुन्हे (Cyber crime) अधिक वाढले आहेत. अनेकजणांना ऑनलाईन फसवणूक केली जात आहे. अनेकांना अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात गंडा घालण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सरकार आणि बँकेकडून वेळोवेळी ग्राहकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान भारतातील मोठी असणारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) देखील आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट (SBI Alert) सूचना दिल्या आहेत. मात्र, अशाच पद्धतीप्रमाणे बँकेनं एका बनावट मेसेज (Message) पासून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ते सविस्तर जाणून घ्या.

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांना पॅन कार्डबाबत (Pan Card) एक मेसेज येत आहे. या मेसेजमध्ये ‘SBI Yono App’ अकाउंट सस्पेंड होण्याबाबत सांगितलं जात आहे. यावरून SBI ग्राहकांसाठी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. असल्या कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेऊ नका असं म्हटलं आहे. सायबर गुन्हेगारांकडून ग्राहकांना मेसेज पाठवले जात आहे. त्या मेसेज मध्ये SBI युजर तुमचं SBI Yono अकाउंट ब्लॉक झालं आहे. तुमचं पॅन कार्ड (Pan Card) अपडेट करा, असं म्हटलंय. या मेसेजमध्ये पॅन कार्ड (Pan Card) अपडेट करण्यासाठी एक लिंक देखील देण्यात आलीय. ही लिंक बँकेच्या अधिकृत वेबसाईटची लिंक नाही. या वेबसाईटचं नाव SBI सारखं आहे. मात्र, ते SBI चं नाही. या लिंकवर क्लिक केल्यानंतर ग्राहकांना अडचणीला सामोरे जावे लागू शकते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

ग्राहकांना युजर आयडी, पासवर्ड, डेबिट कार्ड नंबर, पीन, सीवीवी सारख्या पर्सनल आणि बँकिंग डिटेल्स मागणाऱ्या लिंक, कॉल, SMS, ईमेलवर कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचं SBI बँकेनं सांगितलं आहे. अशावेळी ग्राहक Phishing/Smishing/Vishing attempt ची तक्रार [email protected] वर करू शकतात. याचबरोबर हेल्पलाइन क्रमांक 155269 वर देखील तक्रार करता येणार असल्याचं बँकेनं ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे.

या दरम्यान, सायबर गुन्हेगार (Cyber criminals) बँकेच्या लिंकप्रमाणे, वेबसाईटप्रमाणे अगदी
जवळपास सारखीच दिसणारी लिंक, वेबसाईट बनवतात. परंतु, यामध्ये काहीसा फरक असतोच.
म्हणून बँकेच्या अथवा अन्य कोणत्याही नावाने आलेली लिंक थेट ओपन न करता. त्याची पडताळणी
करावी. कोणत्याही लिंकवर क्लिक न करता, खासगी माहिती देखील कोणाला शेअर करू नका, असं बँकेकडून (SBI) सांगण्यात आलं आहे.

Web Title : SBI Alert sbi customers getting pan card update message beware of this sms check details

हे देखील वाचा :

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांचा पुन्हा वाढणार पगार, जाणून घ्या यावेळी किती होईल वाढ; ‘या’ पध्दतीनं करा कॅलक्युलेशन

PMRDA | ‘पीएमआरडीए’ने गावनिहाय सर्वेक्षण करून आरक्षणात बदल करावा

Milind Narvekar | किरीट सोमय्या यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मिलिंद नार्वेकर यांचा बंगला अखेर ‘जमीनदोस्त’

Related Posts