IMPIMP

Pune Crime | ‘बाळूमामा’ यांचा अवतार असल्याचा बनाव करून लाखोंची फसवणूक ! मनोहर मामा भोसले यांच्यासह तिघांवर अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा आणि इतर कलमानुसार पहिला गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

by bali123
Pune Crime | Millions cheated by pretending to be the incarnation of 'Balumama'! Manohar Mama Bhosale and three others have been booked under the Aghori Practices and Witchcraft and Elimination Act and other sections.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन (नितीन पाटील) Pune Crime | बारामती मधील एका तरुणाच्या फिर्यादीवरून पुणे ग्रामीण पोलिसांनी बारामती तालुका पोलीस स्टेशन मध्ये मनोहर मामा भोसले Manohar Mama Bhosale (रा. उंदरगाव, तालुका करमाळा, जि.सोलापूर), विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओमकार शिंदे या तिघांविरुद्ध भादवि कलम 420, 384, 506, 34 सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा 2013 चे कलम 3,2 औषध चमत्कारी उपाय अधिनियम व नियम 1954 चे कलम 7 नुसार गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

याबाबत बारामती मधील 23 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. हा गुन्हा ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट 2021 चे दरम्यान घडला आहे.
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी यांना मनोहर भोसले यांनी ते बाळूमामा (Balumama) यांचा अवतार असल्याचा
बनाव करून त्यांच्या वडिलांचा गळ्यातील थायराईड कॅन्सर बरा करतो असे सांगून
बाभळीचा पाला साखर भंडारा खाण्यास देऊन विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा वनकर
शिंदे यांच्यासोबत संगणमत करून वेळोवेळी 2 लाख 51 हजार 500 रुपये घेतले.
मनोहर भोसले आणि इतरांनी माझ्या वडिलांचे व माझे जीविताची भीती घालून मला पैसे
देण्यास भाग पाडून माझी फसवणूक केली व पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत म्हंटले आहे.
हा गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. बारामती पोलीस अधिक तपास करत आहेत.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामतीचे अप्पर अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण अधिक तपास करत आहेत.
या सारख्या कोणाच्या तक्रारी असतील किंवा कोणाची फसवणूक झाली असेल तर त्या नागरिकांनी बारामती तालुका पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

 

Web Titel : Pune Crime | Millions cheated by pretending to be the incarnation of ‘Balumama’! Manohar Mama Bhosale and three others have been booked under the Aghori Practices and Witchcraft and Elimination Act and other sections.

Related Posts