IMPIMP

Fact Check | Tokyo Olympics मध्ये ‘गोल्ड मेडल’ जिंकण्याच्या खुशीमध्ये भारत सरकार देतंय 12 महिन्यांचा Free Recharge? जाणून घ्या ‘सत्य’

by nagesh
Fact Check | pib fact check claim on social media that govt is giving 12 month free recharge because neeraj chopra won gold claim is fake

मुंबई न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन Fact Check | नुकतंच भारतीय स्टार खेळाडू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) भारताचा इतिहास रचत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. या ऐतिहासिक कामगिरीमुळे नीरजचे सर्वत्र कौतुक होत आहे. टोकियोमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic 2020) भालाफेकपटू नीरज चोप्रा गोल्ड मेडलचा मानकरी ठरला आहे. दरम्यान, सध्या शोधलं मीडियावर असा दावा करण्यात आला आहे की, नीरज चोप्राने सुवर्ण पदक (Gold medal) जिंकण्याच्या खुशीत भारत सरकारने (Government of India) सर्व लहान मुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी 2399 रुपयांचा 12 महिन्यांचा रिचार्ज मोफत (Free recharge) देण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रसारित SMS मध्ये एका लिंकवर क्लिक करणे असं देखील म्हटलं आहे. मात्र, तुम्हाला असा कोणता मेसेज आला असेल अथवा तुम्ही लिंकवर क्लिक केलं असेल तर वेळीच सावध राहा. याबाबत PIB Fact Check ने खुलासा केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हा केला गेलेल्या दाव्याची पडताळणी केंद्रीय संस्था PIB ने केलीय.
तर, पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) च्या टीमने या दाव्याची पडताळणी
(Verification) करून हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट केलं आहे.
पीआयबी फॅक्टने (PIB Fact Check) सांगितलं आहे की, ऑलिम्पिकमध्ये मध्ये सुवर्णपदक मिळण्याच्या खुशीत भारत सरकार 12 महिन्यांचा रिचार्ज फ्री देत आहे, हा दावा खोटा आहे.
भारत सरकारने फ्री रिचार्ज (Free recharge) बाबत कोणतीही घोषणा केली नाही.
कृपया अशा कोणत्याही बनावट लिंकवर तुमची खासगी माहिती शेअर करू नका.
असं PIB ने आपल्या ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

दरम्यान, या खोट्या दाव्यामध्ये असं देखील सांगितलं आहे की,
ही ऑफर केवळ 15 ऑगस्टपर्यंत उपलब्ध आहे.
तर, तुम्हाला असा कोणता मेसेज आला असेल तर त्यातील लिंकवर क्लिक करू नका.
शिवाय कोणतीही वैयक्तिक माहिती अशा लिंकवर शेअर करू नका.
असं PIB कडून सांगण्यात आलं आहे. या दरम्यान, जर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजना अथवा धोरणांबाबतच्या सत्यते बाबत संशय असल्यास, तुम्ही PIB Fact Check कडे ते पाठवू शकता.
वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्याचबरोबर मेलच्या माध्यमातून PIB Fact Check शी संपर्क करू शकता. यासाठी व्हॉट्सअप (WhatsApp) क्रमांक 8799711259 यावर संपर्क साधू शकता.
तसेच, ट्वीटर @PIBFactCheck, फेसबुकवर PIBFactCheck आणि [email protected] ईमेलद्वारे देखील तुम्ही संपर्क करू शकता. असं सांगण्यात आलं आहे.

Web Title : Fact Check | pib fact check claim on social media that govt is giving 12 month free recharge because neeraj chopra won gold claim is fake

हे देखील वाचा :

Cyberchondria | इंटरनेटवर आजारांबाबत शोध घेण्याने वाढून शकते तुमचे आजारपण, जाणून घ्या कसे?

Pune Crime | अमेरिकन कंपनीच्या फसवणूकप्रकरणी ‘पॅकस्पेस एंटरप्राइजेस’च्या हार्दिक ओसवाल, दीपक सुतार आणि प्रदीप तांगडे यांच्याविरूध्द गुन्हा

LPG Cylinder Subsidy | तुम्हाला सुद्धा LPG वर सबसिडी मिळत नाही का?, चेक करा ‘हे’ कारण तर नाही ना? खुप सोपी आहे पद्धत, जाणून घ्या

Related Posts