IMPIMP

India vs England 5th test | …म्हणून भारत विरुद्ध इंग्लंड 5 वी कसोटी रद्द; इंग्लंड विजयी घोषित

by nagesh
india vs england 5th test ind vs eng manchester test cancelled

मँचेस्टर : वृत्तसंस्था – India vs England 5th test | मँचेस्टर मधील भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी (India vs England 5th test) दरम्यान भारतीय क्रिकेट संघाने (Indian team) कसोटी मधून माघार घेतली आहे. यामुळे आता इंग्लंडला मँचेस्टर (Manchester) कसोटीमध्ये विजयी घोषित करण्यात आलं आहे. इंग्लंडला विजयी घोषित केल्याने भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सीरिज 2-2 नं बरोबरीत झाली आहे. मँचेस्टर कसोटीआधी भारतीय संघातील फिजिओला कोरोनाची बाधा झाल्याने बदललेल्या परिस्थितीमध्ये भारताने ही कसोटी न खेळण्याचा निर्णय (India vs England 5th test) घेतला आहे.

भारतीय क्रिकेट (Indian team) संघाचे ज्युनिअर फिजिओ योगेश परमार (Yogesh Parmar) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona report positive) आला आहे.
योगेश यांच्याआधी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि फिल्डिंग कोच आर. श्रीधर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी रद्द झाल्याची घोषणा इंग्लंड क्रिकेट बोर्डानं देखील केली आहे.

तसेच कसोटी रद्द झाल्यानंतर ओके टाटा बाय-बाय अशा मोजक्या शब्दात कार्तिकनं ट्विट केलं आहे. कार्तिकनं या सीरिजमध्ये कॉमेंट्रीही केली आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यानं देखील मँचेस्टर टेस्ट रद्द झाल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, भारतीय संघाच्या सिनिअर खेळाडूनं मॅचच्या दरम्यान कोणत्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली तर परिस्थिती आणखी खराब होईल अशी चिंता व्यक्त केली होती.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हे देखील वाचा :-

Pune Corporation Recruitment | इंजिनिअर्सची पुणे महापालिकेत होणार भरती; जाणून घ्या

Maharashtra IPS Transfer | राज्यातील 6 आयपीएस अधिकार्‍याची पदोन्नतीने पदस्थापना

Pune NCP | पालिकेतील सत्ताधाऱ्यांची ‘कायदेशीर’ गोची करणाऱ्या नगरसेवक अ‍ॅड.. भय्यासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड

Related Posts