IMPIMP

Neeraj Chopra | मायदेशी परतताच गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

by nagesh
Pune News | Stadium at Pune’s Army Sports Institute to be named after Olympic gold medalist Neeraj Chopra

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  टोकियोमध्ये ऑलिम्पिकमध्ये (Olympics in Tokyo) सुवर्णपदक (Gold medal) पटकावलेला भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्राचे (Neeraj Chopra) सर्वत्र कौतुक होत आहे. भालाफेक नीरज चोप्रा (Neeraj Chopra) भारतात आल्यांनतर थोडी प्रकृती बिघडली आहे. नीरज चोप्रा याची प्रकृती सध्या ठीक नाही. मायदेशी परतल्यांनंतर नीरज चोप्राने पानीपत (Panipat) येथील एक स्वागत समारंभ अर्धवट सोडला. त्यांनतर त्याची प्रकृती ठीक नसल्याने आज (मंगळवारी) रुग्णालयात दाखल केले गेले. नीरजला ताप अधिक असल्याने त्याला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आलीय.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

यापूर्वी नीराजला ताप असल्याने त्याची कोरोना चाचणी (Corona test) देखील केली होती.
नंतर त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह (Negative) आला होता. दरम्यान, पानिपत येथे एका कार्यक्रमावेळी नीरजला स्टेजवरच थोडं अस्वस्थ वाटू लागले.
त्यानंतर नीरजला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नीरज (Neeraj Chopra) दिल्ली ते पानीपत अशा कार रॅलीमध्ये सहभागी झाला होता.
त्यावेळी नीरज अस्वस्थ वाटत होता.
दरम्यान, मायदेशी परतल्यानंतर नीरज हा विविध सत्कार कार्यक्रमात सहभागी होता.
तसेच त्याच्या मूळगावी त्याच्या स्वागताची खास तयारी केली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या स्वागताची तयारी करण्यात येत होती.

दरम्यान, नीरजच्या (Neeraj Chopra) स्वागताची जंगी तयारी करण्यात आली होती.
त्याच्या कुटुंबाने हजारो लाडू तयार करण्यासाठी शंभर हून जादा आचारी कामाला लावले होते.
यासाठी गुरुवारपासून काम सुरु होते. तसेच, त्याचं जंगी स्वागत होईल.
त्याच्यासाठी चुरमा तयार केला आहे. त्याचं सुवर्णपदक आम्ही मंदिरात ठेवू. मी त्याच्या येण्याची वाट बघत आहे.
असं नीरजच्या आईने म्हटलं आहे. नीरजच्या स्वागताची पूर्ण तयारी झाली आहे.
त्याचं स्वागत जंगी असणार आहे आणि नातेवाईक, गावकऱ्यांना या स्वागत समारंभासाठी बोलावलं आहे.

Web Title : neeraj chopra leaves welcome ceremony admitted hospital

हे देखील वाचा :

OBC Political Reservation | ओबीसी आरक्षणावरुन शरद पवारांनी केंद्रावर खापर फोडले नाही, फडणवीसांनी साधला राज्य सरकारवर निशाणा (व्हिडिओ)

Pune Crime | पुण्याच्या हिंजवडीमधील जमीन नावावर करून घेत 2.5 कोटींची फसवणूक; उत्तुंग पाटीलला अटक

Rupali Chakankar | ‘चंद्रकांतदादा आपलं जितकं वय आहे, तितकी शरद पवारांची संसदीय कारकीर्द आहे’ (व्हिडीओ)

Related Posts