सरकारसत्ता ऑनलाईन – Rituraj Gaikwad | ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या स्पर्धेमध्ये त्याने एकाच ओव्हरमध्ये सात षटकार मारून विश्वविक्रम केला आहे. ऋतुराज गायकवाडचा सध्याचा फॉर्म आणि त्याची कामगिरी पाहता तो आगामी वनडे विश्वचषकात नक्की दिसेल, अशी आशा ऋतुराजचे प्रशिक्षक आणि वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीचे वरिष्ठ प्रशिक्षक मोहन जाधव यांनी व्यक्त केली आहे. (Rituraj Gaikwad)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
काय म्हणाले मोहन जाधव?
ऋतुराज वयाच्या 11 व्या वर्षापासून चांगली बॅटिंग करायचा. तो एक दिवस भारतीय संघासाठी खेळेल असं नक्की वाटायचं. ते त्याने सत्यात उतरूनदेखील दाखवलं आहे. ऋतुराज हा सलामीवीर आहे, त्याने अनेक सामने स्वतःच्या बळावर जिंकून दिले आहेत. विनय आणि ऋतुराजची सलामी जोडी असायची. त्यांनी एका सामन्यात सलामीसाठी 512 धावांची भागीदारी केली होती. 512 धावांपैकी 309 धावा ऋतुराजने ठोकल्या होत्या. त्याला सातत्य टिकवून खेळायला आवडते असे प्रशिक्षक मोहन जाधव म्हणाले. (Rituraj Gaikwad)
मागच्या काही वर्षांपासून ऋतुराज भारतीय संघ आणि आयपीएलसाठी खेळत आहे.
ऋतुराजचा सलामीला येऊन संघाला जिंकवण्याचा नेहमी प्रयत्न असतो.
भारतात होणाऱ्या पुढील वनडे विश्वचषकात नक्की दिसेल. ऋतुराजवर भारतीय संघाने विश्वास दाखवायला हवा.
आज तो टीमबाहेर आहे. पण, तो ज्यावेळी टीममध्ये येईल तेव्हा तो सातत्य टिकवून खेळेल,
असे प्रशिक्षक मोहन जाधव म्हणाले. महेंद्रसिंह धोनीने शोधलेला हा हिरा आगामी काळात कशी कामगिरी करतो
हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जर ऋतुराजने आपला फॉर्म असाच ठेवला तर त्याला लवकरच टीम इंडियामध्ये
संधी मिळू शकते.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
Web Title :- Rituraj Gaikwad | coach mohan jadhav believes that rituraj gaikwad will definitely appear in the upcoming odi world cup
Jubin Nautiyal | प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल रुग्णालयात दाखल; डोक्याला झाली गंभीर दुखापत
Ration Card News | आता नाही करता येणार रेशन दुकानदारांना मापात ‘पाप’; सरकारने घेतला ‘हा’ निर्णय