IMPIMP

Virat Kohli Leave Captaincy | कोहलीची ‘विराट’ घोषणा ! वर्ल्ड कपनंतर T-20 फॉर्मेटचे कर्णधारपद सोडणार

by nagesh
Virat Kohli | Virat Kohli clean bold in his 100th Test match Watch the video

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Virat Kohli Leave Captaincy | विराट कोहली (Virat Kohli Leave Captaincy) ने आज गुरुवारी घोषणा केली की, तो ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संयुक्त अरब अमीरातमध्ये टी-20 वर्ल्ड कपच्या नंतर भारताच्या टी-20 टीमचे कर्णधारपद सोडणार आहे. मात्र, त्याने हे स्पष्ट केले की, तो टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व सुरूच ठेवणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सोबतच विराट कोहलीने म्हटले की, त्याने मुख्य कोच रवी शास्त्री आणि रोहित शर्मा यांच्यासह
अनेक सहकार्‍यांसोबत चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला आहे.
त्याने हे सुद्धा म्हटले की, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) चे अध्यक्ष सौरव गांगुली
आणि सचिव जय शाह यांना आपला निर्णय कळवला आहे.

कोहलीने टी-20 अंतरराष्ट्रीय सामन्यांचे कर्णधारपद सोडण्याचे कारण कार्यभार व्यवस्थापन करण्यासंदर्भात सांगितले आहे.
भारत 24 ऑक्टोबरला दुबईत पाकिस्तानविरूद्ध आपल्या टी 20 वर्ल्ड कप अभियानाची सुरूवात करेल. कोहली 19 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या आयपीएल 2021 च्या उर्वरित सामान्यांत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू चे नेतृत्व करेल.

काय म्हणाला कोहली…

विराट कोहलीने सोशल मीडियावर जारी एका वक्तव्यात म्हटले आहे की, मी केवळ भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी भाग्यशाली नाही तर आपल्या पूर्ण क्षमतेसह भारतीय क्रिकेट टीमचे नेतृत्व सुद्धा करत आहे.
मी त्या सर्वांना धन्यवाद देतो ज्यांनी भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार म्हणून माझ्या प्रवासात माझे समर्थन केले.

मी खेळाडू, सहकारी स्टाफ, निवड समिती, माझे कोच आणि प्रत्येक भारतीय जो आमच्या विजयासाठी खेळले, त्यांच्याशिवाय काहीही करू शकत नव्हतो.

विरोटने म्हटले, वर्कलोड समजून घेणे एक खुप महत्वाची बाब आहे आणि मागील 8-9 वर्षात सर्व 3 प्रकारांमध्ये खेळणे आणि मागील 5-6 वर्षापासून नियमितपणे कर्णधारपद सांभाळण्याचा जास्त
कार्यभार पाहता, मला वाटते की, मला टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये भारतीय टीमचे नेतृत्व
करण्यासाठी पूर्णपणे तयार होण्यासाठी स्वताला स्थान देण्याची आवश्यकता आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

कोहलीने म्हटले की, मी टी-20 कर्णधार म्हणून आपल्या काळात संघाला सर्वकाही दिले आणि पुढे जात एक फलंदाज म्हणून टी-20 टीमसाठी असे करणे सुरूच ठेवणार आहे.

‘खरोखरच, या निर्णयावर येण्यास खुप वेळ झाला आहे. माझ्या जवळचे लोक,
रवीभाई आणि रोहित, जे नेतृत्व गटाचे एक अनिवार्य भाग राहिले आहेत.
त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर, मी ऑक्टोबरमध्ये दुबईत या टी-20 वर्ल्ड कपनंतर
टी-20 कर्णधार म्हणून पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मी निवड समितीसह सचिव जय शाह आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशी
सुद्धा चर्चा केली आहे.
मी आपल्या पूर्ण क्षमतेने भारतीय क्रिकेट आणि भारतीय संघाची सेवा करणे सुरू ठेवणार आहे.

Web Title : Virat Kohli Leave Captaincy | virat kohli step down from capatancy indian cricket team

हे देखील वाचा :

Love Relationship | तुमच्या प्रेमाला प्रभावित करायचंय? तर ‘या’ सवयींपासून लांब रहा; जाणून घ्या

PM Modi | खालिस्तानी दहतवाद्यांच्या गटाने दिली PM मोदींना धमकी, म्हणाले – ‘तुम्हाला शांत झोपू देणार नाही’

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 215 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts