IMPIMP

Pune Crime | पुण्यात ‘रो हाऊस’साठी गुंतवणूक केलेले पैसे परत न मिळाल्याने कॅटरिंग व्यावसायिकाची आत्महत्या

by nagesh
Pune Crime | Catering businessman commits suicide in Pune

पुणे न्यूज (Pune News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)–   पुण्यातील (Pune Crime) लोहगाव (Lohgaon) येथे रो हाऊससाठी गुंतवलेले पैसे अनेक वर्षे परत न मिळाल्याने येरवडा येथील एका कॅटरिंग व्यवसाय (Catering business) करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली. गणेश लाड (वय-32) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police) अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रो हाऊसमध्ये (row house) गुंतवलेले पैसे (invest money) परत मिळाले नसल्याने गणेशने आत्महत्या (Pune Crime) केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

गणेश लाड (Ganesh Lad) हा येरवडा परिसरातील एक तरुण कॅटरिंग व्यावसायिक होता.
त्यासोबत शिव वाहतूक सेना (Shiv Vahatuk Sena) व बी.के. ग्रुपचा (B.K. Group) सदस्य होता. बुधवारी रात्री त्याने अचानक गळफास घेऊन आत्महत्या केली.
गणेशने लोहगाव येथे रो हाऊससाठी एका डेव्हलपर्सकडे (Developers) पैसे गुंतवले होते.
मात्र, डेव्हलपर्सकडून रो हाऊस किंवा पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे तो तणावात होता.
या तणावातून त्याने बुधवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली.

गणेशच्या आत्महत्येनंतर लोहगाव येथील डेव्हलपर्सवर गुन्हा दाखल करावा यासाठी त्याची पत्नी व नातेवाईक येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) आले होते.
त्यामुळे याठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गणेश लाडवर येरवडा येतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
गणेशच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, एक भाऊ आणि तीन बहिणी असा परिवार आहे.
पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Catering businessman commits suicide in Pune

हे देखील वाचा :

SBI ग्राहकांचा प्रश्न – खात्यात किती रुपये ठेवण्याची आवश्यकता? जाणून घ्या याचे योग्य उत्तर

Coronavirus in India | ऑगस्टमध्ये सातत्याने वाढत आहेत कोरोनाच्या नवीन केस, कालच्या तुलनेत 4 % वाढीसह आली सुमारे 45 हजार प्रकरणे

Tokyo Olympics | बजरंगाची ‘कमाल’ ! किर्गिस्तानच्या अरनाजरवर केली ‘मात’

Related Posts