IMPIMP

Aadhaar Card मध्ये जन्म तारीख अपडेट करणे झाले आता आणखी सोपे, केवळ फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

by nagesh
Aadhaar Card Updates | you will not have to go to aadhar center for updates like aadhar card phone number and biometric at home

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– बारा अंकी Aadhaar Card जारी करणारी संस्था UIDAI ने ही सवलत दिली आहे की, कुणीही आधार कार्डधारक सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टलद्वारे आधार कार्डमध्ये (Aadhaar Card) जन्म तारीख अपडेट करता येऊ शकते.

युआयडीएआयने म्हटले आहे की, केवळ डिक्लेयर्ड किंवा अनव्हेरिफाईड डेट ऑफ बर्थ ऑनलाइन अपडेट केली जाऊ शकते. डेट ऑफ बर्थ अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्राची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

युआयडीएआयने केले ट्विट

याबाबत युआयडीएआयने एक ट्विट करत म्हटले आहे की, #AadhaarOnlineServices आपण खाली दिलेल्या लिंकद्वारे आधारमध्ये ऑनलाइन जन्म तारीख अपडेट करू शकता – https://ssup.uidai.gov.in/ssup/ जर सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्सची लिस्ट पहायची असेल तर या लिंकवर क्लिक करा… https://uidai.gov.in/images/commdoc/valid_documents_list.pdf

शुल्क :

ट्विट सोबतच्या फोटोत म्हटले आहे की, ऑनलाइन पोर्टलवर कोणत्याही प्रकारच्या अपडेटसाठी 50 रुपये प्रति अपडेट शुल्क आहे. एकावेळी एकापेक्षा जास्त अपडेट केले तरी 50 रुपयेच भरावे लागतील.

मोबाइल नंबर आवश्यक :

आधारशी संबंधीत या सेवांसाठी मोबाइल नंबर अपडेटेड असावा. सोबतच मदतीसाठी 1947 वर कॉल करू शकता किंवा [email protected] वर ईमेल पाठवू शकतो.

DoB Update करण्याची प्रोसेस

– Aadhaar Card मध्ये डेट ऑफ बर्थ अपडेट करण्यासाठी सर्वात प्रथम https://ssup.uidai.gov.in/ssup/ आपल्या ब्राऊजरमध्ये उघडा.

– आता 12 अंकाचा आधार क्रमांक टाका.

– यानंतर कॅप्चा कोड टाका आणि नंतर सेंड ओटीपीवर क्लिक करा.

– तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर जो ओटीपी आला आहे, तो टाकून या पोर्टलवर लॉगइन करा.

– आता अपडेट डेमोग्राफिक डिटेल्सवर क्लिक करा.

– येथे ऑफ बर्थ सिलेक्ट करा.

– अचूक जन्म तारीख टाका आणि नंतर सपोर्टिंग डॉक्युमेंट अपलोड करा.

– आता 50 रुपयांची फी भरा आणि रिक्वेस्ट सबमिट करा.

– एक रेफरन्स नंबर मिळेल, तो नोट करा.

– याच वेबसाइटद्वारे रिक्वेस्टची स्थिती जाणून घेवू शकता.

Web Title : aadhaar card news date of birth update in aadhaar becomes easier here is step by step guide

हे देखील वाचा :

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना आणखी एक मोठी भेट ! थेट खिशावर परिणाम, जाणून घ्या

Earn Money | 2 रुपयांची ही नोट तुम्हाला रातोरात बनवू शकते लखपती, जाणून घ्या कसे

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात म्हशीने धडक दिल्याने आयटी इंजिनियरने केला थेट मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts