IMPIMP

ACB Maharashtra | कोरोनाच्या दुसर्‍या वर्षात ‘लाचखोरी’ची लागण ! महसुल अग्रस्थानी मात्र ‘वसुली’त पोलिसांची आघाडी, ‘कॉन्स्टब्लेरी’च जाळ्यात अडकण्याचे प्रमाण अधिक

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन ACB Maharashtra | कोरोनामुळे व्यवहार ठप्प झालेल्या २०२० या वर्षापेक्षा यंदाच्यावर्षी लाचखोरीचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये पहिल्या आठ महिन्यांत नेहमीप्रमाणे पहिले आणि पोलिस दलाने दुसरे स्थान कायम राखले आहे. मात्र, लाचखोरीमध्ये पोलिस दल हे दुसर्‍या क्रमांकावर राहीले असले तरी लाचखोरीत (ACB Maharashtra) पकडलेली रक्कम ही महसुल विभागापेक्षा अधिक असल्याने पोलिस दलातील ‘चिरीमिरीचा’ रेट हा अन्य कोणत्याही विभागापेक्षा ‘हाय’ असल्याचे दिसून येत आहे. त्यातही वर्ग एक आणि दोनच्या अधिकार्‍यांपेक्षा वर्ग तीन अर्थात ‘कॉन्स्टेबलरी’ च या सापळ्यात अधिक अडकत असल्याचे निदर्शनास येत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मुंबईचे सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांनी दरमहा शंभर कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचे विधान करून खळबळ उडवून दिल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. एवढेच नव्हे तर त्यांच्यामागे सीबीआय, ईडी आणि एनआयए या केंद्रीय तपासयंत्रणांचा ससेमिराही लागल्याचे उदाहरण ताजे आहे. यावर्षी मार्चमध्ये घडलेल्या या घटनेचे पडसाद आजही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात उमटत आहे. पोलिस आणि चिरिमिरी हे तसे नवीन समिकरण नसले तरी या घटनेमुळे संपुर्ण राज्य पोलिस दल हादरून गेले आहे. मात्र, यानंतरही ‘चिरिमिरीच्या’ गोरख धंद्याला अटकाव लागू शकलेला नाही, हेच वास्तव राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अर्थात अँन्टी करप्शनने या वर्षी पहिल्या आठ महिन्यांत केलेल्या कारवायांमधून दिसून येत आहे.

मागील संपुर्ण वर्ष कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाउनमध्ये गेले. लॉकडाउनमध्ये आरोग्य यंत्रणेसोबत महसुल व पोलिस यंत्रणेने चांगले काम केले, यामध्ये दुमत नाही. परंतू नियमित कामामध्ये अद्यापही सुधारणा होत नसल्याचे प्रकर्षाने समोर येत आहे. यावर्षी जानेवारी ते ऑगस्टमध्ये अँन्टी करप्शनने ५३२ गुन्हे दाखल केले असून ७४७ शासकिय सेवकांना अटक केली आहे. यामध्ये महसुल विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांवर सर्वाधीक अर्थात १३३ गुन्हे नोंदविले गेले आहेत. यासाठी लावलेल्या सापळ्यांत १९३ जणांना अटक केली असून लाचेची रक्कम ३१ लाख ७६ हजार ७०० रुपये सापडली आहे. त्याचवेळी याच कालावधीत पोलिस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांवर लाचप्रकरणी १०८ गुन्हे दाखल झाले असून १६२ अधिकारी, कर्मचार्‍यांना अटक केली आहे. यामध्ये ३७ लाख ५ हजार १०० इतकी लाचेची रक्कम सापडली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

लाच प्रकरणी महसुल विभागातील प्रथम श्रेणीतील १४ अधिकारी, द्वीतीय श्रेणीतील ४,
वर्ग तीनचे १११ सेवक आढळून आले आहेत. तर या व्यवहारात ‘तोडगा’ करणार्‍या ३९ एजंटांचाही समावेश आहे.
त्याचवेळी महसुलपेक्षा २५ गुन्हे कमी असलेल्या पोलिस दलातील प्रथम श्रेणीतील ७ आणि द्वितीय श्रेणीतील ८ तर वर्ग तीनचे तब्बल १२३ कर्मचार्‍यांना लाचखोरीत अटक करण्यात आली आहे.
तर लाचखोरीत ‘मध्यस्थी’ करणार्‍या १७ खाजगी एजंटांचाही समावेश दिसून आला आहे.

राज्यामध्ये प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांची संख्या कमी अधिक आहे.
यामध्ये महसुल विभागात सर्वाधिक अधिकारी व कर्मचारी आहेत, त्यापाठोपाठ पोलिस दलाचा क्रमांक लागतो.
त्यामुळे महसुल विभागातील लाचखोरीची सर्वाधिक प्रकरणे समोर येत असली तरी लाच घेताना पकडले गेल्यांमध्ये पोलिस दलातील वर्ग ३ च्या कर्मचार्‍यांचा अर्थात ‘कॉन्स्टब्लरी’ची संख्या अधिक आहे.
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रिदानुसार प्रत्यक्षात रस्त्यावर जनतेच्या पहिल्यांदा संपर्कामध्ये येणार्‍या
समस्त पोलिस कर्मचार्‍यांसाठी ही मान खाली घालायला लावणारी बाब असल्याचेच अँन्टी करप्शन विभागाच्या कारवाईचे विश्‍लेषण केल्यास दिसून येते.

१ जानेवारी ते ८ सप्टेंबर २०२१ पर्यंतचा ‘लाचखोरीचा’ लेखाजोखा
५३२ गुन्हे दाखल – ५६ प्रथम श्रेणीतील अधिकारी -७६ द्वितीय श्रेणीतील अधिकारी – ४०६ वर्ग तीनचे कर्मचारी – ७४७ एकूण अटक – लाचखोरीत सापडले १ कोटी ५१ लाख ४३ हजार ७०० रुपये.
(लाचखोरीमध्ये ७४७ लोकसेवकांना अटक केली असून त्यांना १ कोटी ५१ लाख ४३ हजार ७०० रुपये घेताना अटक केली आहे.
याचाच अर्थ सरासरी २० हजार २७२ रुपयांसाठी एकाला अटक करण्यात आली असून नोकरी गमावण्याची वेळ आली आहे).

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Titel :- ACB Maharashtra | Corona’s second year of ‘bribery’! At the forefront of revenue, however, the police lead in ‘recovery’, while ‘constablary’ is more likely to be caught

हे देखील वाचा :

Gold Price Update | सोन्याच्या दरातील घसरणीमुळे खरेदीदारांची ‘चांदी’, जाणून घ्या 14, 18, 22, 23 आणि 24 कॅरेटचे नवीन दर

Pune Corporation | चोवीस तास पाणी पुरवठा योजनेच्या कामात ‘टर्मिनेट’ केलेल्या कंपनीची ‘जायका’ नदीसुधारसाठी निविदा; ‘जॉंईट व्हेंचर’मध्ये मदत केल्याने अडचणीत !

Pune Crime | पुण्यात मांत्रिकाच्या मदतीने आघोरी पुजा करुन पतीला ब्लॅकमेक करुन 1 कोटीची मागणी; पत्नीसह 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts