IMPIMP

Anti Corruption Pune | 1,10,000 ची लाचघेणारा हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात; पुणे ग्रामीण पोलिस दलात प्रचंड खळबळ

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Anti Corruption Pune |गुन्हा दाखल न करण्यासाठी मदत करण्यासाठी एका हवालदाराने तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची मागणी करुन १ लाख १० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Pune) सापळा रचून या हवालदाराला रंंगेहाथ पकडले. यामुळे पुणे ग्रामीण पोलिस दलामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दादासाहेब नामदेव ठोंबरे (वय ५०) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. दादासाहेब ठोंबरे हा बारामती
तालुका पोलीस ठाण्यात (Baramati Taluka Police) नेमणूकीला होता. याप्रकरणी एका २८ वर्षाच्या
तरुणाने तक्रार दिली आहे. मारहाणीच्या प्रकरणातून तक्रारदार तरुणाचे नाव कमी व त्याच्यावर गुन्हा
दाखल न करण्यासाठी मदतीसाठी दादासाहेब ठोंबरे याने १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितली. या तरुणाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Pune) धाव घेतली. त्यांनी केलेल्या पडताळणीत तोडजोड होऊन ठोंबरे याने १ लाख १० हजार रुपये घेण्याचे मान्य केले.

पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (superintendent of police rajesh bansode), अपर पोलीस
अधीक्षक सुरज गुरव (additional superintendent of police suraj gurav), अपर पोलीस अधीक्षक
सुहास नाडगौडा (additional superintendent of police suhas nadgouda) यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विजयमाला पवार (DySp Vijaymala Pawar), पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे (Police Inspector Shriram Shinde) , पोलीस अंमलदार रतेश थरकार, अंकुश आंबेकर यांनी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून १ लाख १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दादासाहेब ठोंबरे याला रंगेहाथ पकडण्यात आले. बारामती तालुका पोलीस ठाण्यात (Baramati Taluka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : Anti Corruption Pune | Havaldar of baramati taluka police station of pune rural police arrested while taking bribe of Rs 1,10,000 by anti-corruption

हे देखील वाचा

Vedika Shinde | 16 कोटींचे इंजेक्शन दिलेल्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या वेदिका शिंदेचा मृत्यु

Sanjay Raut | संजय राऊतांचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंना टोला, म्हणाले…

Crime News | अनोळखी महिलेला तरुणानं मारली घट्ट मिठी; दादर रेल्वे स्टेशनवरील विचित्र प्रकार समोर

Monsoon And Covid | ‘कोरोना’ आणि ‘मान्सून’संबंधी आजार कसे ओळखाल? जाणून घ्या तज्ज्ञांचं म्हणणं

Related Posts