IMPIMP

Aruna Bhatia Death | अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन, अभिनेता म्हणाला – ’आज मी असह्य वेदनांमध्ये आहे…’

by nagesh
Aruna Bhatia Death | akshay kumar mother died actor says today i feel unbearable pain

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Aruna Bhatia Death | अक्षय कुमार (Akshay Kumar) ची आई अरुणा भाटिया (Aruna Bhatia Death) यांचे निधन झाले आहे. बुधवारी (8 सप्टेंबर) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अक्षय कुमारने ही दु:खद बातमी स्वत: सोशल मीडियाद्वारे (Social Media) चाहत्यांना दिली. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. अक्षय काही दिवसापूर्वीच आईला भेटण्यासाठी भारतात परतला होता.

आजारी असलेली आपली आई अरुणा भाटिया यांच्यासाठी एक दिवस अगोदर चाहत्यांना प्रार्थना करण्याची विनंती अक्षयने केली होती.

आता अक्षयने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेयर करत लिहिले आहे की, ती माझ्या जीवनात सर्वात महत्वाची होती. आज मी असह्य वेदनेत आहे : माझी आई
अरुणा भाटिया हे जग सोडून गेली आहे आणि आता ती पप्पा सोबत आली आहे. आम्हाला तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेची आवश्यकता आहे, कारण आता
आमचे कुटुंब या कठिण काळाला तोंड देत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अरुणा भाटिया यांची प्रकृती मागील खुप दिवसांपासून नाजूक होती आणि याच कारणामुळे त्यांना मुंबईच्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
कुटुंबाच्या विनंतीनंतर हॉस्पिटलने अरुणा भाटिया यांच्या उपचाराची माहिती गुप्त ठेवली आहे. शुक्रवारी सायंकाळी अक्षयच्या आईला हॉस्पिटलमध्ये
दाखल करण्यात आले होते. अक्षय कुमार आपल्या आईच्या अतिशय जवळ आहे. वृत्त समजताच अक्षय लंडनहून मुंबईत परतला.

अक्षय कुमारच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदरच त्याच्या आईने या जगाचा निरोप घेतला आहे. अक्षयने
मंगळवारी आपल्या चाहत्यांना विनंती केली होती की, माझ्या आईच्या प्रकृतीच्या चिंतेत तुम्हा सर्वांना पाहून मी भावनिक झालो आहे. ही माझ्यासाठी
आणि माझ्या कुटुंबासाठी कठिण वेळ आहे. तुमच्या प्रार्थनेची आवश्यकता आहे.

Web Title : Aruna Bhatia Death | akshay kumar mother died actor says today i feel unbearable pain

हे देखील वाचा :

Pune Police Suspended | पुण्यातील पोलीस उपायुक्तांच्या प्रस्तावात केली परस्पर ‘खाडाखोड’; पोलीस अंमलदार तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या प्रकरण

Corporator Dheeraj Ghate | महापालिका निवडणुकीचा मार्ग ‘साफ’ करण्यासाठी धीरज घाटे यांच्यावर हल्ल्याचा ‘कट’; एका राजकीय पक्षाच्या तिघांच्या अटकेने शहरात खळबळ, जाणून घ्या ‘अंदर की बात’

Obesity Problems | शास्त्रज्ञांचा इशारा : 18-24 वर्षाच्या तरूणांमध्ये ‘या’ समस्येचा सर्वात जास्त धोका, होऊ शकतात अनेक आजार; जाणून घ्या

Related Posts