IMPIMP

Baramati Crime | गोळीबार अन् ‘मोक्का’मधून जामिनावर सुटलेल्या माजी सरपंच जयदीप तावरेंना ‘दुग्धभिषेक’

by nagesh
baramati crime milk bath former sarpanch who released mocca bail 

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Baramati Crime | माळेगावमधील राष्ट्रवादीचे (Malegaon NCP) काँग्रेसचे कार्यकर्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय रविराज तावरे (Raviraj Taware) यांच्यावरील गोळीबार प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या माजी सरपंच जयदीप तावरे यांचा मोक्का न्यायालयाने (MOCCA Court) काही दिवसांपुर्वी जामीन मंजूर (Bail granted) केला. जामिनावर मुक्त झाल्यानंतर ग्रामस्थांनी जयदीप तावरे यांना दुग्धभिषेक (milk bath) घालत जल्लोष साजरा केला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

माळेगाव येथे 31 मे रोजी रविराज तावरे यांच्यावर गोळीबार (Firing) करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या पाच तासात 4 आरोपींना अटक (Arrest) केली होती. तसेच बारामती पोलिसांनी (Baramati police) मोक्का अंतर्गत कारवाई (Mocca action) केली होती. पोलिसांनी 15 दिवसांत या प्रकरणाचा तपास करुन मोक्का अंतर्गत कारवाई केल्याची ही पहिलीच घटना होता. परंतु काही दिवसांनंतर रविराज तावरे यांच्या जबाबावरुन पोलिसांनी राष्ट्रवादीचे माजी सरपंच जयदीप तापवेर यांना अटक केली होती.

जयदीप तावरे यांना अटक अटक केल्यानंतर माळेगाव ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. यावेळी तावरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ माळेगाव येथे बंद पुकारण्यात आला होता. या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान गावामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, पोलिसांनी मोक्का न्यायालयात सदर गोळीबाराच्या गुन्ह्यात जयदीप तावरे यांचा हात नसल्याप्रकरणी युक्तीवाद कोर्टात केला.
त्यानंतर पुण्याच्या मोक्का न्यायालयाने तावरे यांची जामिनावर मुक्तता केली.
त्यामुळे ग्रामस्थांनी तावरे यांना दुधाने अंघोळ घालत आनंद व्यक्त केला.

Web Title :- baramati crime milk bath former sarpanch who released mocca bail

हे देखील वाचा :

Pune Municipal Corporation | राज्य सरकारला हाय कोर्टाचा दणका; महानगर नियोजन समितीला दिली स्थगिती

University Grants Commission | भारतातील 24 विद्यापीठं बोगस ! UP प्रथम क्रमांकावर, महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा समावेश

Pune News | पुण्यावरील निर्बंधांचा तातडीने फेरविचार करावा; व्यापारी, कष्टकरी, उद्योजक यांना राज्य सरकारने दिलासा द्यावा – माजी आमदार मोहन जोशी

Related Posts