IMPIMP

Buldhana RTO | मोटार वाहन निरीक्षक लाच घेतायत की दंड वसूल करतायत?

by nagesh
Buldhana RTO | buldana motor vehicle inspector taking money

बुलडाणा न्यूज :   Buldhana RTO | एका मोटार वाहन निरीक्षकाचा (Motor Vehicle Inspector) वाहन चालकांकडून पैसे घेतल्याचा माध्यमांवर प्रसारित झाल्याचं समोर आलं आहे. परंतु, मोटार वाहन निरीक्षकांनी घेतलेले पैसे, ते लाच नाही तर वाहनाला चलन करून आकारण्यात आलेल्या दंडाची (Penalty) पावती आहे. ते मोटार वाहन निरीक्षक बुलढाणा (Buldhana RTO) जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात (RTO) कार्यरत आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

राजेंद्र निकम (Rajendra Nikam) असं मोटार वाहन निरीक्षकाचे नाव आहे.
तर,आमच्या खात्याची प्रतिमा मलीन केल्या प्रकरणी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या चालकाचा निषेध बुलडाणा RTO गोपाल वरोकार यांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिरते वाहन तपासणी पथकामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये मोटार वाहन निरीक्षक राजेंद्र निकम (Vehicle Inspector Rajendra Nikam) हे कर्तव्यांवर होते.
तेव्हा (6 ऑगस्ट) रोजी दुपारी 12 च्या दरम्यान वाहन तपासणी वेळी त्यांनी MH. 28 H .8036 नंबरची 3 चाकी मालवाहू ऑटो रिक्षा तपासणी केली.
त्यावेळी त्याच्याकडे फिटनेस, इंशोरन्स, परवाना, रिफ्लेक्टर आणि PUC चे कोणतेही कागदपत्रे न्हवती. दरम्यान, ऑटो रिक्षा धारक शेख रहेमान याला मोटार वाहन निरीक्षक राजेंद्र निकम (Rajendra Nikam) यांनी सदर ऑटो रिक्षाला (Auto rickshaw) चलन करीत 9 हजार 700 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

9 हजार 700 रुपयाचा ठोठावलेला दंड ऑटो रिक्षा (Auto rickshaw) चालकाने निकम यांच्याकडे भरले. त्यावेळी निकम यांनी पैसे भरून घेतले.
दरम्यान, दंड भरतेवेळी पैसे मोजत असल्यावर आणि मोटार वाहन निरीक्षक राजेंद्र निकम (Vehicle Inspector Rajendra Nikam) यांना पैसे देत असल्यावर केंद्र करीत व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला गेला.
तर, हा व्हिडीओ पाहणाऱ्याला वाटतो की, मोटार वाहन निरीक्षक लाचेचे पैसे घेत आहे.
म्हणून हा उद्धटपणा आहे. त्यामुळे नागरिकांची दिशाभूल केली जाते.
याबाबत RTO गोपाल वरोकार (Gopal Warokar) म्हणाले की, नियमाने काम करीत असतांना व्हिडीओ व्हायरल केल्याबाबतीत निश्चितच हा प्रकार विभागाच्या समोर, वरिष्ठांच्या समोर ठेवू, त्यांच्याकडण तसे निर्देश प्राप्त होतील.
त्यानुसार त्या चालकांवर आम्ही कारवाई (Action) करू असं त्यांनी म्हटलं आहे.

Web Title : Buldhana RTO | buldana motor vehicle inspector taking money

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 226 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Minister Nawab Malik | ‘केंद्राकडून राज्याला लसपुरवठा होत नसल्याने लसीकरणाची केंद्रे बंद करावी लागतायत’

Crime News | महिलेचा राडा ! मास्क न घातल्याने आडवणार्‍या पोलिसाला केली लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पहा Video

Related Posts