IMPIMP

CM Uddhav Thackeray | ‘व्यासपीठावर उपस्थित माझे भावी सहकारी…’ CM उद्धव ठाकरे याचं मोठं विधान, राजकीय वर्तुळात चर्चा

by nagesh
CM Uddhav Thackeray | uddhav thackeray mentions bjp leders future colleagues aurangabad

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन CM Uddhav Thackeray | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे दोघे आज एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात या दोन्ही मंत्र्यांची उपस्थिती होती. यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. भविष्यात भाजपबरोबरच्या युतीसंदर्भात सुचक वक्तव्य केल्याने उपस्थित सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

नुकतंच काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. एका कार्यक्रमात बोलताना पाटील म्हणाले की, मला आता माजी मंत्री म्हणू नका एक-दोन दिवसांत काय ते कळेल, असं विधान केल्याने चर्चेला उधान आलं. यांनतर आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही मोठं विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत.

कार्यक्रमादरम्यान बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले की,
‘व्यासपीठावर उपस्थित आजी, माजी आणि भविष्यात एकत्र आलो तर माझे भावी सहकारी…’,असं त्यांनी मोठं विधान केलं आहे.
त्यावेळी व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड उपस्थित होते.
यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विधानामुळे कार्यक्रमात जोरदार चर्चास सुरुवात झाली.
यामुळे या विधानाची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहेत. या मोठ्या विधानाने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आजी सहकारी म्हणजेच काँग्रेसचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात,
माजी सहकारी म्हणून उपस्थित भाजपाचे नेते असा उल्लेख केला.
यानंतर भविष्यात एकत्र आलो तर भावी सहकारी असं म्हणत त्यांनी भाजपा नेत्यांकडे पाहिलं.
मुख्यमंत्री ठाकरेंच्या या विधानामुळे राजकारणात चर्चेला उत येत आहे.

Web Title :- CM Uddhav Thackeray | uddhav thackeray mentions bjp leders future colleagues aurangabad

हे देखील वाचा :

Call Blocking Android Apps | सातत्याने येणारे ‘स्पॅम कॉल्स’ अडथळा निर्माण करतात? मग ‘या’ 5 अ‍ॅप्समधून नंबर्स करा ब्लॉक, जाणून घ्या

Ration Card | नवीन शिधापत्रिकेसाठी आता उत्पन्न दाखल्याऐवजी हमीपत्रही ‘ग्राह्य’

NCRB | ऑनलाइन फसवणुकीत देशात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर

Earn Money | 1 लाख रूपये लावून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, 60 लाखापर्यंत होईल नफा; जाणून घ्या कशी करावी सुरूवात?

Related Posts