IMPIMP

Coronavirus | ‘कोरोना’चा उगम झाला ‘त्या’ वुहानमधील 1.10 कोटी रहिवाशांची चीन करणार पुन्हा Test

by nagesh
Coronavirus | Chinese city of Wuhan to test all residents after first Covid-19 cases in over a year

बिजिंग : वृत्तसंस्था वुहानमधील प्रयोगशाळेतून कोरोनाचा (Coronavirus) उगम झाला आणि त्याने संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले. ‘त्या’ वुहानमध्ये तब्बल एक वर्षानंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात डेल्टा व्हेरियंटचा (Delta variant) समावेश आहे. त्यामुळे वुहान प्रशासनाने शहरातील सर्व 1 कोटी 10 लाख रहिवाशांची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

वुहानचे वरिष्ठ अधिकारी ली ताओ यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
शहरातील 1 कोटी 10 लाख रहिवाशांची सर्वसमावेशक न्यूक्लिक अ‍ॅसिड चाचणी (Nucleic acid test) सुरु करत आहोत. शहरामध्ये स्थलांतरीत कामगारांमध्ये कोरोनाचा लक्षणे आढळून आली आहे.
त्यातील 7 कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
गेल्या वर्षभरानंतर प्रथमच वुहानमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

चीनमध्ये मंगळवारी 61 स्थानिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
त्यात वेगाने पसरणार्‍या डेल्टा व्हेरियंटचे एक डझनहून अधिक जणांचा समावेश आहे.
नानजिंगमधील विमानतळ सफाई कामगारांमध्ये संक्रमण झाल्यानंतर देशभरात डेल्टाचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली.
त्यातूनच मग चाचण्या वाढविण्याचा निर्णय चीन प्रशासनाने घेतला.

Web Title : Coronavirus | Chinese city of Wuhan to test all residents after first Covid-19 cases in over a year

हे देखील वाचा :

e-RUPI | सरकारने लाँच केला डिजिटल पेमेन्ट प्लॅटफॉर्म e-RUPI, कुठे होईल वापर आणि कसे करते काम, जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

PM Shram Yogi Man Dhan pension | रोज 2 रुपये जमा करून मिळवा 36000 रुपये पेन्शन, जाणून घ्या डिटेल

Maharashtra Unlock | मुंबईला एक न्याय आणि पुण्याला दुसरा न्याय लावल्याने पुणेकरात संतापाची लाट; व्यापारी आंदोलनावर ठाम, आज शहरात 21 ठिकाणी घंटानाद

Related Posts