IMPIMP

EPFO | किमान पेन्शन आणि व्याजदरावर आज येणार निर्णय ! 3000 रुपये होऊ शकते पेन्शन, जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Interest on PF | epfo latest update interest rate credit date how to check balance and other details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ईपीएफओ (EPFO) मेंबर्ससाठी आज मोठी बातमी येऊ शकते. मोदी सरकार (Modi govt) पीएफ खातेधारकांच्या (PF account holders) किमान पेन्शनची रक्कम (Pension money) लवकर वाढवू शकते. मीडिया रिपोर्टनुसार, 20 नोव्हेंबरला EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीची बैठकी होणार आहे.

या बैठकीत अनेक मोठ्या निर्णयांवर चर्चा होणार आहे. बैठकीचा मुख्य अजेंडा पेन्शनची किमान रक्कम आणि व्याजदरांवर निर्णय घेण्याचा आहे.

EPFO ने 20 नोव्हेंबर 2021 ला दिल्लीत होणार्‍या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) च्या मीटिंगसाठी सर्क्युलर जारी केले आहे. बैठकीत सहभागी होणार्‍या सदस्यांसाठी अजेंडा सुद्धा जारी केला आहे. अपेक्षा आहे की या मीटिंगमध्ये व्याजदर आणि किमान पेन्शनबाबत निर्णय होऊ शकतो.

CBT ची शेवटची बैठक मार्चमध्ये श्रीनगरमध्ये झाली होती.
सीबीटीने 2020-21 साठी सदस्यांसाठी खात्यात ईपीएफ जमा रक्कमेवर
8.5 टक्के वार्षिक व्याजदर देण्याची शिफारस केली होती.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , TelegramFacebook page for every update

इतकी होऊ शकते पेन्शन
मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय ट्रेड यूनियनने सध्याची किमान पेन्शन वाढवून 1,000 रुपयावरून 6,000 रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. तर सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी किंवा CBT ती वाढवून 3,000 रुपये करू शकते.

EPFO च्या पैसे खासगी कॉर्पोरेट बाँडमध्ये गुंतवणूक करण्याच्या वादग्रस्त मुद्दा सुद्धा बैठकीत चर्चेचा विषय होईल.
सोबतच 2021-22 साठी पेन्शन फंडचा व्याजदर काय असावा, या मुद्द्यावर सुद्धा निर्णय होऊ शकतो.

किमान पेन्शन
सीबीटी न्यूनतम पेन्शन वाढवून 3,000 रुपये करण्याचा निर्णय घेऊ शकते.
ट्रेड यूनियन ती वाढवण्याची मागणी करत आहे. असे म्हटले जात आहे की,
ईपीएफमध्ये जमा रक्कमेवर 8.5 टक्केच्या सध्याचा व्याजदर जारी राहू शकतो.
सध्याच्या व्याजदरात बदल होण्याची शक्यता कमी आहे.

Web Title :- EPFO | epfo board meet on november 20 may be 3000 rupees increase in pension money check details in marathi

Sharad Pawar | 3 कृषी कायदे रद्द केल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘उशिरा का होईना, शहाणपण आलं’

Multibagger Stock | 20 रुपयावरून 9,985 वर पोहचला ‘हा’ शेयर, गुंतवणुकदारांचे 20 हजार झाले 1 कोटी रुपये; तुमच्याकडे आहे का?

Related Posts