IMPIMP

GST Restrictions Relaxations | करदात्यांना दिलासा ! जुलैमध्ये 1.16 लाख कोटी जीएसटी संकलन; करदात्यांना सीएच्या प्रमाणपत्राची गरज नाही?

by nagesh
GST | taxpayers with turnover more than 2 crore file gstr 9 gstr 9c before 31 december

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे (Corona second wave) देशभरात निर्बंध लावले होते. त्याचा परिणाम वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलनावर झाला आहे. त्यानंतर आता निर्बंध शिथिल झाले असल्याने जीएसटी (GST Restrictions Relaxations) संकलन पुन्हा सुरु झाले. जुलै महिन्यात संकलनात वाढ झाली असून 1.16 लाख कोटी रुपये एवढे जीएसटी संकलन झाले आहे. केंद्र सरकारचा जीएसटी (Central Government GST) 22 हजार 197 कोटी, राज्यांचा जीएसटी (states GST) 28 हजार 541 कोटी आणि आय जीएसटी 57 हजार 864 कोटी रुपये एवढा गोळा झाला. दरम्यान, ऑक्टोबरनंतर प्रथमच जूनमध्ये जीएसटी (GST Restrictions Relaxations) संकलन एक लाख कोटी रुपयांच्या खाली घसरले होते. जूनमध्ये 92 हजार 822 कोटी रुपये एवढा जीएसटी गोळा झाला होता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

करदात्यांना दिलासा

केंद्रीय अप्रत्यक्ष व सीमा शुल्क मंडळाने (Customs Board) एका महत्त्वाच्या विषयावर स्पष्टीकरण दिले आहे. ज्या करदात्यांची उलाढाल पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे त्यांना वार्ष‍िक परतावा स्वप्रमाणित करता येणार आहे. ‘सीए’मार्फत सत्यापन (CA certificate) करण्याची त्यांना गरज राहणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे याचा हजारो करदात्यांना दिलासा मिळाला आहे.

GST संकलनात 33 टक्क्यांनी वाढ

जीएसटी संकलन (GST collection) गतवर्षीच्या तुलनेत यंदा 33 टक्के जास्त झाले आहे. आयात केलेल्या वस्तूंवरील कर संकलन 36 टक्क्यांनी वाढले आहे. एप्रिल 2020 पासून सप्टेंबर 2020 पर्यंत लॉकडाऊनमुळे (Lockdown) जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांपेक्षा कमी होते.
यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा कठोर निर्बंध लावण्यात आले होते.
त्यामुळे जूनमध्ये जीएसटी संकलन घटले होते.

Web Title :  GST Restrictions Relaxations | gst restrictions relaxed gst taxpayers do not need ca certificate

 

हे देखील वाचा :

Shivsena | शिवसेनेची सामनातून भाजपवर टीका; ‘राज्यात भाजपचा ‘अंतकाळ’ जवळ आलाय’

Pune Rural Police | पुणे- सातारा महामार्गावर पट्टेरी वाघाची कातडी विक्री करणारी टोळी गजाआड

SBI ग्राहकांनी लक्ष द्यावे ! खात्यात कमी बॅलन्स पडणार महागात, ATM वर व्यवहार फेल झाला तर लागेल ‘पेनल्टी’; ‘या’ पध्दतीनं टाळा

Related Posts