IMPIMP

How To Increase CIBIL Score | ‘सिबिल स्कोर’ वाढवण्यासाठी ‘हे’ नियम पाळा; कर्ज मिळवण्यासाठी कुठलीही येणार नाही अडचण, जाणून घ्या

by nagesh
How To Increase CIBIL Score | follow these rules to increase your cibil score

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – How To Increase CIBIL Score | भारतातील सर्वच बँका आता ग्राहकांना कर्ज (Bank loan) उपलब्ध करुन देण्यासाठी सिबिल स्कोर (CIBIL Score) तपासत असतात. त्यामुळे अनेक ग्राहकांना कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत असतात. त्यामुळे ग्राहकांना आता त्यांचा सिबिल स्कोर व्यवस्थित ठेवणे महत्वाचे असते. दरम्यान, ग्राहकांचा सिबिल स्कोअर बँकांसाठी एवढा महत्वाचा का झाला आहे ? असा सवाल देखील उपस्थित होतो आहे. (How To Increase CIBIL Score)

सिबिल (CIBIL) स्कोर हा नंबर अथवा रेटिंग आहे जे सांगते की तुम्ही तुमचे कर्ज फेडण्यात अथवा इतर आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात किती गंभीर आहात. तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल अथवा इतर कर्ज वेळेवर भरले नाही, तर तुमच्या सिबिल स्कोअरवर थेट परिणाम होतो. खराब सिबिल स्कोर पाहून, बँका कर्ज देण्यास नकार देतात. अथवा व्याजदर कमी करण्यास नकार देत असतात. दरम्यान, सिबिल स्कोअर उत्तम करण्यासाठी पाच पर्याय कोणते ते जाणून घ्या. (How To Increase CIBIL Score)

1. क्रेडिट युटिलायझेशन रेशो कमी ठेवा (Credit Utilization Ratio) –
कंपन्या तुमच्या क्रेडिट युटिलायझेशन रेशोवर अधिकाधिक लक्ष देतात. तर तुम्हाला मिळालेल्या क्रेडिट लिमिटपैकी किती रक्कम वापरली जातेय. 30 टक्क्यांपर्यंत गुणोत्तर राखणाऱ्याला कंपन्या चांगले मानतात. जर तुम्ही 50 टक्के अथवा त्याहून जादा वापरत असाल, तर तुम्ही तुमचे खर्च भागवण्यासाठी कर्जावर अवलंबून आहात हे दाखवू शकते.

2. वेळेवर आणि पूर्ण पैसे देण्याची सवय लावा –
तुमचा फोन, पाणी, वीज, क्रेडिट कार्ड बिल अथवा इतर कोणत्याही प्रकारचे देणे वेळेवर भरण्याची सवय लावा. त्याचबरोबर, पूर्ण पेमेंट करण्याचा प्रयत्न करा, कारण कमीत कमी रक्कम (minimum Amount) भरल्यास तुम्ही तात्पुरतं त्यातून मुक्त व्हाल. पण, भविष्यात ते तुमचे कर्ज फक्त महागच करणार नाही तर सिबिल स्कोअरही खराब करू शकते.

3. संयुक्त खात्यावरही नजर ठेवा –
समजा तुमचे संयुक्त खाते असेल तर त्यावरही लक्ष ठेवा. तुमच्यासह खातेधारकांनी वेळेवर कोणतीही थकबाकी भरली नाही आणि तुम्ही डिफॉल्ट कराल. यामुळे तुमचा सिबिल स्कोअरही खराब होऊ शकतो.

4. वर्षातून तीनदा क्रेडिट हिस्ट्रीचे पुनरावलोकन करा (Credit History) –
तुमच्या सिबिल अहवालावर सतत लक्ष ठेवावे आणि दर चार महिन्यांनी त्याचे पुनरावलोकन करावे.
क्रेडिट हिस्ट्री पाहून, तुम्हाला कळेल की सर्व पेमेंट रेकॉर्ड समान रीतीने राखले जात आहेत.
जर तुम्ही कोणतेही खाते अथवा कार्ड बंद केले असेल तर तेही तपासावे लागेल.

5. एकाच वेळी अनेक ठिकाणी कर्जासाठी अर्ज करू नका –
तुम्हाला नवीन क्रेडिट कार्ड (New Credit Card) घ्यायचे असेल अथवा कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर एकाच वेळी अनेक ठिकाणी अर्ज करू नका.
याचा तुमच्या सिबिल स्कोअरवर वाईट परिणाम होतो.
यामुळे कंपन्यांना असे वाटते की तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थिरतेबाबत शंका आहे.

Web Title :- How To Increase CIBIL Score | follow these rules to increase your cibil score

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Pune Crime | शेअरमध्ये गुंतवणुकीतून जादा परताव्याच्या आमिषाने 10 लाखांची फसवणूक

Pune Crime | शेअरमध्ये गुंतवणुकीतून जादा परताव्याच्या आमिषाने 10 लाखांची फसवणूक

Kirit Somaiya | पुण्यातील कोविड सेंटरचं कंत्राट चहावाल्याला ! किरीट सोमय्या थेट मुंबईच्या चहावाल्याच्या दुकानात; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…

Related Posts