IMPIMP

IND vs ENG | KL Rahul वर इंग्लंडच्या प्रेक्षकांनी फेकली दारूच्या बाटलीची झाकणं, भडकलेल्या Virat Kohli ने दिली अशी रिअ‍ॅक्शन

by bali123
IND vs ENG | english fans threw whiskey bottle caps on kl rahul virat kohli shows anger

नवी दिल्ली : IND vs ENG | भारत आणि इंग्लंडमध्ये (IND vs ENG) खेळल्या जात असलेल्या टेस्ट सिरिजमध्ये मोठ्या कालावधीनंतर स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. इंग्लंडचे प्रेक्षक नेहमीच विरोधी संघासोबत अतिशय वाईट वर्तन करत असतात. परंतु, लॉर्ड्सवर खेळवल्या जात असेलल्या पाच मॅचच्या सिरिजच्या दुसर्‍या टेस्टमध्ये तर या प्रेक्षकांनी सर्व मर्यादा ओलांडल्या.

राहुलसोबत झाले वाईट वर्तन

लॉर्ड्स टेस्टच्या तिसर्‍या दिवशी इंग्लंडच्या प्रेक्षकांनी एक अतिशय लाजिरवाणे वर्तन केले. स्टँड्समध्ये बसलेल्या इंग्लंडच्या प्रेक्षकांनी बाऊंड्रीवर फिल्डिंग करत असलेला टीम इंडियाचा स्टार खेळाडू केएल राहुलसोबत वाईट वर्तन केले. काही प्रेक्षकांनी राहुलवर दारूच्या बाटल्यांची झाकणे फेकण्यास सुरूवात केली. ज्यानंतर राहुलने या घटनेची तक्रार संघाचा कर्णधार विराट कोहलीकडे केली.

https://twitter.com/fanofpspk26/status/1426512620647948299

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

भडकलेला दिसला कोहली

राहुलसोबत झालेल्या या वाईट वर्तनाबाबत कर्णधार विराट कोहलीला जेव्हा समजले तेव्हा त्याने प्रचंड रागाने रिअ‍ॅक्शन दिली. कोहली या घटनेने एकदम नाराज झाला होता आणि राहुलला त्याने सांगितले की, ही झाकणे उचलून पुन्हा प्रेक्षकांमध्ये टाक. ही घटना पाहून कॉमेंटेटर सुद्धा नाराज दिसत होते, त्यांनी सुद्धा या प्रेक्षकांवर टीका केली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.

विराटने अंपायर्सकडे केली तक्रार

विराट कोहलीने या घटनेबाबत मैदानातील अंपायर्सकडे तक्रार केली. परंतु अंपायर्सने यावर कोणतीही अ‍ॅक्शन घेतली नाही.
दोन्ही टीम चांगल्या खेळत होत्या.
केएल राहुलचे धडाकेबाज शतक आणि रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या बळावर टीम इंडियाने पहिल्या डावात 364 धावा बनवल्या.
उत्तरादाखल खेळ संपेपर्यंत भारताने इंग्लंडच्या तीन फलंदाजांना बाद केले होते.
परंतु तिसर्‍या दिवशी इग्लंडचे फलंदाज चांगला खेळ करत होते.
कर्णधार जोर रूटने आपले शतक सुद्धा पूर्ण केले आहे. तर जॉनी बेयरस्टोने सुद्धा अर्धशतक केले.

Web Title : IND vs ENG | english fans threw whiskey bottle caps on kl rahul virat kohli shows anger

Corona Vaccination in Maharashtra | राज्याने नोंदवली लसीकरणाचा नवा विक्रम !

Pune Inspector Transfer | पुण्यामधील विविध पोलीस अस्थापनांवरील 45 पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या, काही जणांना मुदतवाढ

Maharashtra Police Transfer | राज्यातील बहुप्रतिक्षित पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त; 1462 पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांच्या ‘ट्रान्सफर’ 

Related Posts