IMPIMP

Kumar Mangalam Birla | कुमार मंगलम बिर्ला यांनी दिला वोडाफोन आयडियाच्या नॉन एग्झिक्यूटिव्ह डायरेक्टर पदाचा राजीनामा

by nagesh
kumar mangalam birla resigns as chairman of vodafone idea

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Kumar Mangalam Birla | आदित्य बिर्ला ग्रुप (Aditya Birla Group) चे चेयरमन कुमार मंगलम बिर्ला (Kumar Mangalam Birla) यांनी वोडाफोन आयडिया लिमिटेड (Vodafone Idea Limited) च्या नॉन-एग्झिक्यूटिव्ह डायरेक्टर आणि नॉन-एग्झिक्यूटिव्ह चेयरमन पदाचा राजीनामा (Resigned) दिला आहे. जो बुधवारी कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने स्वीकारला आहे.

कुमार मंगलम बिर्लाच्या जागेवर कंपनीने हिमांशु कपानिया यांना नवीन नॉन-एग्झिक्यूटिव्ह डायरेक्टर आणि नॉन-एग्झिक्यूटिव्ह चेयरमन नियुक्त केले आहे.
जूनमध्ये कुमार मंगलम बिर्ला यांनी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून वोडाफोन आणि आयडियात आपली भागीदारी सरकारी किंवा फायनान्शियल कंपनीला सोपवण्याबाबत म्हटले होते.

या निर्णयावर कंपनीने काय म्हटले

कुमार मंगलम बिर्ला यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर कंपनीकडून देण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, आयडिया वोडाफोन लिमिटेडच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने कुमार मंगलम बिर्ला यांचा
नॉन एग्झिक्यूटिव्ह चेयरमन आणि नॉन एक्झक्यूटिव्ह डायरेक्टर पदाचा राजीनामा स्वीकारला आहे.

तोट्यात आहे कंपनी

कुमार मंगलम बिर्ला यांनी पत्र लिहिल्यानंतर कंपनीला 2700 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.
आपल्या पत्रात कुमार मंगलम बिर्ला यांनी कंपनीला तोट्यातून काढण्यासाठी 27.66 टक्के आपली
भागीदारी पब्लिक सेक्टर/गव्हर्नमेंट/डोमेस्टिक फायनान्शियल इंटीटी किंवा एखाद्या दुसर्‍या
ज्यास सरकार योग्य मानेल त्यांच्याकडे सोपवण्याबाबत म्हटले होते.

सोबतच बिर्ला यांनी असेही म्हटले होते की, VIL (Vodafone Idea Limited) ची स्थिती खुप वेगाने खराब होत चालली आहे.
आपल्या योजना आणि सरकारची थकबाकी चुकवण्यासाठी कंपनीला 25 हजार कोटी रुपयांची
आवश्यकता आहे. दरम्यान, अनेक प्रयत्नानंतर सुद्धा कंपनीला ही रक्कम जमवण्यात अपयश आले.

Web Title : kumar mangalam birla resigns as chairman of vodafone idea

हे देखील वाचा :

Multibagger Stock | ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल! वर्षभरात 1 लाखाचे झाले रू. 32 लाख, एक्सपर्ट देत आहेत खरेदीचा सल्ला

Modi Government | मोदी सरकारची मोठी घोषणा ! आयुष्मान भारत अंतर्गत मुलांना 5 लाखापर्यंतचा फ्री आरोग्य विमा

Coronavirus | अलर्ट ! मुलांना कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका? जाणून घ्या कशाप्रकारे करावा त्यांचा व्हायरसपासून बचाव

Related Posts