IMPIMP

Menstruation Myths | मासिक पाळीसंबंधी ‘या’ अफवांवर आजही विश्वास ठेवतात लोक, जाणून घ्या ‘सत्य’

by nagesh
Menstruation Myths | menstruation myths related to periods no need to believe

सरकारसत्ता ऑनलाइन  – Menstruation Myths | आजसुद्धा महिला मासिक पाळीसंबंधी (Menstruation Myths) उघडपणे चर्चा करताना कचरतात. काही ठिकाणी मासिक पाळी अपवित्र मानली जाते. शास्त्रीय माहिती नसल्याने मासिक पाळीबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. याबाबत योग्य माहिती असणे आवश्यक आहे. मासिक पाळीबाबतचे हे गैरसमज आणि सत्य जाणून घेवूयात…

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मासिक पाळीचे रक्त खराब असते –
असे मानले जाते की मासिक पाळीचे रक्त खराब असते, परंतु यास खराब म्हणता येणार नाही. यात कोणत्याही प्रकारचे टॉक्सिन्स नसतात. या रक्तात गर्भाशयातील टिशू, म्यूकस लायनिंग आणि बॅक्टेरिया असतात, परंतु हे रक्त खराब म्हणता येणार नाही. ही एक शारीरिक प्रक्रिया आहे, यासाठी कोणतीही लाज वाटण्याचे कारण नाही.

मासिक पाळी चार दिवसांची असावी –
प्रत्येक महिलेचे मासिक पाळीचे एक वेगळे चक्र असते. हे पूर्णपणे शरीरावर अवलंबून असते की महिलांना किती काळापर्यंत मासिक पाळी होते. सामान्य चक्राचा कालावधी 2 ते 8 दिवसांपर्यंत असतो. जर तुम्हाला 2 पेक्षा कमी आणि 8 दिवसांपेक्षा जास्त मासिक पाळी राहात असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मासिक पाळीत आंबट वस्तू खाऊ नये –
काही महिला मासिक पाळीत आंबट वस्तू खाणे टाळतात. परंतु, याचा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. महिलांनी मासिक पाळीत निरोगी आणि संतुलित आहार घ्या आणि जंक फुड टाळावे.

मासिक पाळीत आंघोळ करू नये –
मासिक पाळीचा आंघोळ करणे, डोके धुणे, मेकअप करण्याशी काहीही संबंध नाही.
उलट नियमितपणे आंघोळ आणि इंटिमेट भागाची स्वच्छता ठेवली पाहिजे.
यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

Web Title :- Menstruation Myths | menstruation myths related to periods no need to believe

हे देखील वाचा :

Relationship | कलयुग ! विवाहित महिलेचं ‘एक्स बॉयफ्रेंड’सोबत ‘झेंगाट’, दिला 3 मुलांना जन्म; कारण ऐकून व्हाल ‘हैराण’

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 194 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Gold Price Today | पुन्हा कमी झाले सोन्याचे दर, चांदीची किंमत वाढली; जाणून घ्या आजचे नवीन दर

Related Posts