IMPIMP

Money laundering Case | सचिन वाझेचा खुलासा – ‘शरद पवारांना राजी करण्यासाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी मागितले होते’

by nagesh
Money laundering Case | sachin vaze told ed anil deshmukh demands rs 2 crore convince sharad pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Money laundering Case | मनी लॉड्रिंगप्रकरणी (Money laundering case) ईडीने (ED) आरोपपत्र दाखल केले असून, यामध्ये सचिन वाझेसह (Sachin Vaze) 14 जणांवर आरोप लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या आरोपपत्रात अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे नाव नसल्याची माहिती मिळत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP) शरद पवार (Sharad Pawar) यांना राजी करण्यासाठी अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचा मोठा खुलासा सचिन वाझेने (Sachin Vaze) केल्याचे सांगितले जात आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

ईडीच्या आरोपपत्रात (Indictment) सचिन वाझे याच्यासह अनिल देशमुख यांचे सहाय्यक संजीव पालांडे (Sanjeev Palande) आणि कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांचा समावेश आहे. मुंबईतील बार मालकांकडून वसुली प्रकरणात हे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. या प्रकरणी शेकडो कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तपास यंत्रणेचा संशय आहे. यातच आता सचिन वाझेने ईडीकडे मोठे खुलासे केल्याचे सांगितले जात आहे.

देशमुखांनी 2 कोटी मागितले
शरद पवारांनी सचिन वाझेला मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात पुन्हा रुजू करुन घेण्यास विरोध केला होता. शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपये मागितले होते. जुलै 2020 मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी 10 पोलीस उपायुक्तांच्या बदली आणि नियुक्तीचे आदेश जारी केले होते. या आदेशांवर अनिल देशमुख आणि अनिल परब (Anil Parab) यांनी नाराज होते आणि त्यांनी आदेश मागे घेतला होता, असे सचिन वाझेने सांगितले.

तडजोडीनंतर आदेश जारी केला

तीन ते चार दिवसांनी मला कळले की, पैसे आणि इतर काही तडजोडीनंतर हा आदेश जारी करण्यात आला होता. या पोलीस अधिकाऱ्याकडून एकूण 40 केटी रुपये घेण्यात आले होते. त्यापैकी 20 कोटी रुपये संजीव पालांडे यांच्यामार्फत अनिल देशमुख यांना तर 20 कोटी आरटीओ अधिकारी बजरंग करमाटे (Bajrang Karmate) याच्यामार्फत अनिल परब यांना देण्यात आले होते, असा दावा सचिन वाझेने केला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अनिल देशमुख स्वत: निर्देश द्यायचे
अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला त्यांच्या कार्यालय, घरी, राज्य अतिगृहात बोलावून विविध प्रकरणांच्या संदर्भात थेट निर्देश किंवा सूचना देत असत.
सोशल मीडिया बनावट फॉलोअर केस सारख्या काही प्रकरणात तर अनिल देशमुख यांनी स्वत:च निर्देश द्यायचे, असेही सचिन वाझेने म्हटले आहे.

कुंदन शिंदेकडे पैसे देण्यास सांगितले
अनिल देशमुख यांनी प्रत्येक बारमालकाकडून तीन लाख रुपये गोळा करण्याचे आदेश देत 1750 बार आणि रेस्टॉरंटची यादी देण्यात आली होती.
वाझेने डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत 4.7 कोटी रुपये गोळा केले होते.
त्यानंतर जानेवारी महिन्यात अनिल देशमुख यांनी त्यांच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरुन व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर फोन केला आणि आजपर्यंत गोळा केलेली रक्कम कुंदन शिंदे याच्याकडे देण्याच्या सूचना दिल्याची माहिती सचिन वाझेने दिली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title :- Money laundering Case | sachin vaze told ed anil deshmukh demands rs 2 crore convince sharad pawar

हे देखील वाचा :

Ahmednagar Crime | धक्कादायक ! 13 वर्षीय मुलीचा 24 वर्षीय तरुणासोबत जबरदस्तीने लग्न लावून अत्याचार

PAK vs NZ | PM इम्रान खान सुद्धा वाचवू शकले नाहीत पाकिस्तान-न्यूझीलंड क्रिकेट सीरीज, सुरक्षेच्या कारणामुळे शेवटच्या क्षणी रद्द

Ulhasnagar Crime | घृणास्पद ! 6 वर्षाच्या चिमुकलीवर मामाकडून बलात्कार

Related Posts