IMPIMP

Pan-Aadhar Linking | पॅन-आधार लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली, जाणून घ्या काय आहे नवीन ‘डेडलाईन’

by nagesh
Aadhaar PAN Link-KYC | get these 5 things done before march 31 aadhar pan link bank account kyc update tax saving investments

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Pan-Aadhar Linking | केंद्र सरकारने देशातील सर्वात महत्वाची दोन कागदपत्र आधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅन कार्ड (PAN Card) लिंक करण्याची शेवटची तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे. याची डेडलाईन सहा महिन्यापर्यंत वाढवली आहे. आता तुम्ही 31 मार्च 2022 पर्यत ही दोन्ही महत्वाची कागदपत्र एकमेकांशी लिंक करू शकता. यापूर्वी ही डेडलाईन 30 सप्टेंबर 2021 ला संपणार होती. (Pan-Aadhar Linking)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

31 मार्च 2022 आहे डेडलाईन

ही डेडलाईन वाढवण्यास प्राप्तीकर कायद्यांतर्गत दंड प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची तारीख सुद्धा वाढवून 31 मार्च 2022 केली आहे. केंद्र सरकारने बेनामी मालमत्तेच्या व्यवहारावर सक्षम अधिकार्‍याद्वारे नोटीस जारी करणे आणि आदेश पारित करण्याची शेवटची तारीख सुद्धा वाढवली आहे. मात्र, कोणत्याही असुविधेपासून वाचण्यासाठी लवकरात लवकर हे दोन कागदपत्र लिंक करणे आवश्यक आहे.

पॅनकार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे.
मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, आता यासाठी  31 मार्च 2022 पर्यंत वेळ दिला आहे.
जर लिंकिंग 31 मार्च 2022 पर्यंत केले नाही तर इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट अंतर्गत गंभीर परिणामांतर्गत तुमच्यावर 10000 रुपयांचा दंड सुद्धा लागू शकतो.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सीबीडीटीने म्हटले आहे की, जे लोक इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करत आहेत,
त्यांच्यासाठी पॅनकार्डला आधार जोडणे अनिवार्य आहे.
मागील वर्षी सप्टेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारच्या आधार योजनेला संविधानिक दृष्ट्या वैध केले होते.

Web Title : PAN-Aadhaar Linking | government extends the deadline for linking pan card with aadhaar from 30 september 2021 to 31 march 2022

हे देखील वाचा :

Pune Crime | हप्ता न दिल्याने ‘बिल्डर’ला मारहाण करुन टोळक्याने लुटले; कारची केली तोडफोड करणार्‍या चॉकलेट शिंदेसह 7 जणांवर गुन्हा दाखल

Pune Division Deputy Collectors Transfer | पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या 16 अधिकाऱ्यांच्या बदल्या

Pune News | पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांची बदली ! RDC पदी हिम्मत खराडे तर हवेलीच्या प्रांत अधिकारीपदी संजय आसवले

Related Posts