IMPIMP

Parambir Singh | ‘या’ प्रकरणात परमबीर सिंग यांना 21 ऑक्टोबरपर्यंत मोठा दिलासा; तूर्तास होणार नाही ‘ती’ कारवाई

by nagesh
Parambir Singh | mumbai kila court order about param bir singh as absconding pasted outside his flat marathi news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Parambir Singh | अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अँट्रॉसिटी) दाखल झालेल्या गुन्ह्यात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे. वेळे अभावी न्यायालयात सुनावणी होऊ न शकल्याने 24 मेपासून सुरू असलेली अटक न करण्याची पोलिसांची हमी 21 ऑक्टोबरपर्यंत कायम राहिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे (police inspector bhimraj ghadge) यांनी खोट्या एफआयआरच्या माध्यमातून माझी प्रचंड छळवणूक परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी केली असल्याचा आरोप करत त्यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना परमबीर सिंग यांनी  कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बिल्डरांच्या एका भ्रष्टाचार प्रकरणातील अनेक आरोपींची नावे वगळण्यास सांगितले होते. मात्र त्यांच्या दबावाला मी बळी पडलो नाही.
म्हणून माझ्याच विरोधात अनेक खोटे एफआयआर दाखल करायला लावून त्यांनी माझी प्रचंड छळवणूक केली.
महत्त्वाचे म्हणजे माझी न्यायालयाने ज्या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली त्या प्रकरणात मला 14 महिने नाहक तुरुंगवास भोगावा लागला.
असा गंभीर आरोपही घाडगे यांनी तक्रारीत केला आहे. त्या तक्रारीला  परमबीर यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.
त्यावरील सुनावणी न्या. संभाजी शिंदे व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठासमोर सुरु आहे. शुक्रवारी वेळेअभावी यावर सुनावणी झाली नाही.
त्यामुळे  याचिकेवरील सुनावणीपर्यंत कठोर कारवाई करणार नसल्याची 24 मेपासून सुरू असलेली पोलिसांची हमी कायम रहावी,
अशी विनंती परमबीर यांच्या वकिलांनी केली. त्याविषयी सरकारी वकील जे. पी. याज्ञिक यांनी सहमती दर्शवली.
त्याची नोंद आदेशात घेऊन  खंडपीठाने पुढील सुनावणी 20 ऑक्टोबरला ठेवली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दरम्यान, परमबीर सिंग यांच्याविरोधात अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
त्याच्या चौकशीसाठी ते गैरहजर राहत आहेत. त्यांनी देशाबाहेर पलायन केले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत
असून राज्य सरकारने त्यांच्याविरोधात ‘लुकआऊट नोटीस’ जारी केली आहे.

Web Title :- Parambir Singh | relief to parambir singh arrest till october 21

हे देखील वाचा :

Vishwas Nangre Patil | विश्वास नांगरे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार; जाणून घ्या प्रकरण

Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग तिसर्‍या दिवशी वाढ; जाणून घ्या आजचे दर

Essential Supplements For Women | महिलांनी 30 च्या वयात आवश्य घेतले पाहिजेत ‘हे’ 5 सप्लीमेंट्स

Related Posts