IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 65 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | Zero patient deaths recorded in Pimpri Chinchwad today; Find out more about Corona

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरामध्ये नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 53 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 01 रुग्णाच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , TelegramFacebook page for every update

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation)
वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 53 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 77 हजार 048 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 65 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 2 लाख 72 हजार 865 रुग्णांनी कोरोनावर (Pimpri Corona)
मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात 409 अॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 409 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात शहरातील 01 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4505 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात 14,320 जणांचे लसीकरण

शनिवारी (दि.20) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 14,320 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 24 लाख 67 हजार 646 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title :- pimpri corona discharge of 65 patients of corona in pimpri chinchwad know other statistics

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 86 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’च्या 2 हजाराहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज, गेल्या 24 तासात 833 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Rajasthan Cabinet Reshuffle | गहलोत मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी दिले राजीनामे, मोठी उलथापालथ होण्याची शक्यता

Related Posts