IMPIMP

PM Cares | कोरोनामध्ये अनाथ झालेल्या मुलांना 10 लाख रुपये… ‘पीएम केयर्स फॉर चिल्ड्रन’ची पूर्ण प्रोसेस काय आहे, कसा करावा लागेल अर्ज; जाणून घ्या

by nagesh
PM Cares | know the application process of pm cares for children scheme all details if parents died in corona child will get 10 lakh rupees

नवी दिल्ली : वृत्तसंस्था: PM Cares for Children Scheme | कोरोना महामारीमध्ये अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. असंख्य मुलांवरील आई-वडीलांचे छत्र हरवले आहे. अशा मुलांना मदतीसाठी केंद्र सरकारने ‘पीएम केयर्स फॉर चिल्ड्रन’ योजनेची (PM Cares for Children Scheme) सुरुवात केली आहे. अशा मुलांना वयाच्या 23 व्या वर्षी सरकार 10 लाख रुपयांची मदत करेल. सोबत आरोग्य विम्याच्या माध्यमातून त्यांच्या कल्याणाची व्यवस्था केली जाईल, त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून सशक्त बनवले जाईल.

या योजनेसाठी महिला आणि बाल विकास कल्याण मंत्रालयाने अर्ज देणे आणि मदत मिळवण्यासाठी पात्र मुलांचा शोध घेण्यासाठी pmcaresforchildren.in वर अर्ज मागवले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हेल्प डेस्क, ईमेलने मिळेल मदत

या उद्देशासाठी हेल्प डेस्क स्थापन करण्यात आला आहे.
ज्यावर टेलीफोन द्वारा 011-23388074 वर किंवा ईमेल [email protected] वर संपर्क करता येईल.
योजनेत 11 मार्च 2020 पासून महामारीच्या अखेरपर्यंतच्या मुलांचा समावेश केला जाईल.

जागरूकता आणि ओळख प्रकिया

जिल्हा मॅजिस्ट्रेट, पोलीस, डीसीपीयू, चाईल्ड लाईन आणि सामाजिक संघटनांच्या मदतीने अशा मुलांची ओळख पटवण्यासाठी अभियान चालवले जाईल.
ग्राम पंचायती, आंगणवाडी आणि आशा नेटवर्कला अशा मुलांचा रिपोर्ट देता येईल.

ज्या मुलांनी आपली आई-वडिल दोन्ही गमावले आहेत, आणि ज्यांना योजनेंतर्गत मदतीची गरज आहे.
त्यांना चाईल्ड लाईन (1098), डीसीपीयू किंवा एखाद्या अन्य एजन्सी किंवा व्यक्तीद्वारे सीडब्ल्यूसीच्या समक्ष मुलांची माहिती मिळाल्याच्या 24 तासांच्या आत, ज्यामध्ये प्रवास कालावधीचा समावेश नाही, सादर केले जाऊ शकते.

Web Title : PM Cares | know the application process of pm cares for children scheme all details if parents died in corona child will get 10 lakh rupees

हे देखील वाचा :

Nawab Malik | रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्याकडून फोन टॅपिंगची परवानगी घेतली होती का?

Pune Crime | डायस प्लॉटमध्ये माझे ‘राज’ चालणार म्हणणार्‍या ‘जीएसटी’ गँगच्या प्रमुखाला अटक; तरुणावर कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

Maharashtra Unlock | राज्य अनलॉक होणार? टास्क फोर्ससोबत CM ची बैठक, डॉक्टरांनी मांडलं ‘हे’ मत, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

Related Posts