IMPIMP

PM Modi Birthday | अजित पवार यांनी दिल्या PM मोदींना जन्मदिनाच्या शुभेच्छा; महाराष्ट्राचा उल्लेख करत म्हणाले…

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar statement about nepotism should not be introduced in democracy maharashtra political marathi news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन PM Modi Birthday | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीचा (PM Narendra Modi) आज (17 सप्टेंबर) रोजी जन्मदिन आहे. त्यामुळे आज सर्वत्र मान्यवर, चाहते, राजकीय नेत्यांकडून पंतप्रधान मोदींवर शुभेच्छांचा (PM Modi Birthday) वर्षाव होताना दिसत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या नेत्यांनीही पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी देखील वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं अभिष्टचिंतन केलं आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही पंतप्रधान मोदींना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुभेच्छा देत काही गोष्टींची अपेक्षा देखील केली आहे. अजित पवार यांनी पंतप्रधानांना संदेशाच्या सहाय्याने शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वसमावेशक विकास घडो. असं म्हणत पुढे ते म्हणाले, भारतासारख्या महान लोकसत्ताक देशाचे पंतप्रधान होण्याचं भाग्य आपल्याला दोनदा लाभलं आहे. स्वतंत्र भारतात जन्म झालेले आपण देशाचे पहिले पंतप्रधान आहात. पंतप्रधानपदी झालेली फेरनिवड ही देशवासीयांच्या विश्वासाचं, अपेक्षांचं प्रतिक आहे. असं ते म्हणाले.

देशवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करून त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्याचं बळ आपणास मिळो.
पंतप्रधान म्हणून आपल्या नेतृत्वाखाली देशाची एकता, अखंडता, सार्वभौमत्व, संविधान, लोकशाही व्यवस्था अबाधित राहो.
देशातील महागाई, बेरोजगारी, कोरोनासह आर्थिक, सामाजिक संकटांवर यशस्वीपणे मात करून देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यात आपणास यश मिळो.
अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, ‘महाराष्ट्रातील जनतेच्याही पंतप्रधान म्हणून आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
या अपेक्षांची पूर्तता होईल.
महाराष्ट्राला तसेच समस्त देशवासीयांना समान न्याय,
विकासाची समान संधी उपलब्ध करून देण्याचं काम आपल्याकडून होईल, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

Web Title :- PM Modi Birthday | ajit pawar wishes pm narendra modi on his birthday

हे देखील वाचा :

Gold Price Today | खुशखबर ! 5 महिन्यामधील सर्वात स्वस्त मिळतंय सोने, विक्रमी किमतीपासून 10 हजार रुपयांनी कमी झाला दर

High Court | कुणीही घेऊ शकत नाही 2 प्रौढ व्यक्तींच्या संबंधाला आक्षेप, मग ते आई-वडील असले तरीही – हायकोर्ट

Pune Crime | भावकीच्या वादातून पुतण्याकडून चुलत्यावर कुऱ्हाडीने हल्ला; शिरूर तालुक्यातील घटना

Related Posts